मराठी राजभाषा दिन भाषण | मराठी भाषा गौरव दिन | कुसुमाग्रज भाषण | वि. वा. शिरवाडकर भाषण | Marathi Rajbhasha Din Speech

सन्माननीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज २७ फेब्रुवारी, म्हणजेच जागतिक मराठी राजभाषा दिन, यानिमित्ताने मी आपल्यासमोर जे दोन शब्द मांडणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही विनंती...

तुतारी घालते साद मराठी
मनाने दिलेली दाद मराठी
गुणगान गाऊ तिचे एकदिलाने
महाराष्ट्रात नांदूया मराठी मनाने
अशी ही आपली मराठी मातृभाषा असून आज  27  फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करत आहोत.आपण सर्वजण मराठी भाषा प्रेमी आहोत. आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी भाषेविषयीची अस्मिता जोपासण्यासाठी आज आपण उत्साहाने हा दिवस साजरा करत आहोत.
आपल्या घरातूनच आपल्या मातृभाषेचा विकास आपला होत असतो . कळत-नकळतपणे आपण आपल्या घरातूनच मातृभाषा शिकत असतो आणि त्यातूनच पुढे मग मातृभाषेतूनच आपल्याला जगाची ओळख होत असते. आपल्या घरापासून तर आपल्याला जगापर्यंत नेणारी आपली  भाषा म्हणजे आपली मातृभाषा मराठी होय.
महाराष्ट्रात आपण जन्मलो... महाराष्ट्रात आपण लहानाचे मोठे होतो महाराष्ट्रातच आपला विकास होतो आणि आपल्या संपन्न आणि समृद्ध अशा महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे मराठी. महाराष्ट्रात मराठी भाषेची परंपरा समृद्ध आहे.संस्कृत भाषा ही आपल्या मराठी भाषेची जननी  आहे.
संस्कृत भाषा उच्चारणाला व लिहिण्याचा थोडी कठीण असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणी येत असे, त्यामुळे बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या दृष्टीने भाषा सुकर  व्हावी म्हणून मराठी भाषेचा वापर सुरू झाला असे मानण्यात येते.
आपल्या मराठी भाषेवरील प्रेम असेच अबाधित ठेवून तिच्या उत्कर्षासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे व जागरूक राहणे आवश्यकच आहे.

शेवटी आपला निरोप घेतांना एवढेच म्हणेन की...

तुझ्या अविट गोडीने

ओढ मला ग शब्दांची

जप मराठी श्वासांत

मराठी माऊली लेकरांची

जय हिंद, जय महाराष्ट्र !!

निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

© Copyright Disclaimer : वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

🔖 मराठी राजभाषा दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन

↪️  कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय

↪️  कुसुमाग्रज-जीवन-प्रवास

↪️  कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती

↪️  जन्म-मराठी-भाषेचा

↪️  मराठीची-बोलू-कौतुके

↪️  माझी-मातृभाषा-मराठी

↪️  मराठी-आमुची-मायबोली

↪️  मराठी-भाषा-गीत-डाऊनलोड

🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन

↪️  नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय

↪️  विज्ञान-म्हणजे-काय?

↪️  विज्ञान-हे-वरदानच

↪️  विज्ञानाची-वैशिष्ट्ये

↪️  MP3-विज्ञान-गीत-डाऊनलोड

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post