20 मार्च जागतिक चिमणी दिवस | जागतिक चिमणी दिन मराठी माहीती | International Sparrow Day Marathi Inoformation | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

जागतिक चिमणी दिन

मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षणआणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला.

‘अतिपरिचयात अवज्ञा' म्हणजे नेहमी दिसणा-या गोष्टींचे खरे महत्त्व जाणवत नाही. असा त्याचा साधारण अर्थ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांची संख्या कमी होणे हे त्याचे एक उदाहरण ! वाढत्या प्रदुषणामुळेच चिमण्यांची संख्या कमी झाली, हे खरेतर विनाशाचेच प्रतीक आहे.

जगभरातील लोककथा आणि 'चिऊताई चिऊताई दार उघड' सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून हा 'वर्ल्ड स्पॅरो डे' साजरा केला जाऊ लागला आहे.

भारतातील नाशिकमधील 'नेचर फॉरएव्हर सोसायटी आणि फ्रान्समधील 'इकोसिस ॲक्शन फाउंडेशन' या संस्थांनी इतरही असंख्य स्वयंसेवी संस्थांबरोबरच या बाबीचा - विस्तृत अभ्यास केला. चिमण्यांची घटती संख्या हे वातावरणातील वाढत्या प्रदुषणाचे लक्षण आहे काय, हे शोधण्यासाठी जगभर चळवळ उभारली. २०१५ सालाच्या दिवसाची मुख्य संकल्पना होती 'आय लव्ह स्पॅरों दिल्ली महापालिकेने चिमणी हा तेथील राज्य पक्षी जाहीर केला आहे.

'हे चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' हे ग. दि. माडगूळकरांचे गाणे आजच्या दिवसाला पूर्णपणे लागू होते. असे म्हटले तर चुकीचे ठरता कामा नये, एक घास चिऊताईचा असे म्हणून • आई आपल्या बाळाला एक एक घास मायेने भरवते. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. शहरात मातीची भिंत किंवा कौलारू घरे पाहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला दिसत नाही. अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी बागडणारी चिमणी कुठे दिसणार?

सिमेंटच्या जंगलात झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्याने अपवादात्मक झाडे आपल्या नजरेस पडतात. कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे होणारी सकाळ आता केवळ आठवणींची स्थिती झाली आहे. एकीकडे मुंबई पुणे या महानगरात सामान्यतः आढळणारी चिमणी म्हणजे इंडियन कॉमन स्पॅरोचे दर्शन दुर्मिळ होत असताना पर्यावरणाच्या संवर्धन निमशहरी भागातील शहरात अनेक प्रकारच्या चिमण्या सकाळ संध्याकाळ गुंजारव करतात. यासाठी आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत परिसरात जर खाद्यपदार्थाची सोय असेल, तर आपल्याला चिमण्या दिसू शकतील. याचाच अर्थ असा नाही कि आज आपण बर्ड फीड ठेवले आणि उद्या ८-१० चिमण्या दिसतील. चिमण्यांना याची सवय होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. चिमणी आणि पिटकांठ किंवा रान या दोन प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यातील हाऊस स्पॅरो अर्थात आपल्या परिसरात दिसणारी चिमण्यांची संख्या सध्या कमी होत आहे. चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. ग्रामीण भागात चिमण्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. प्रमुख अन्न बिया, भात, गहू, बाजरी मात्र शहरात खाद्य चिमण्यांना मिळत नाही. खेड्यातील महिला धान्य निवडतानाही चिमण्यांना ते खायला देतात. शहरी भागात फारशी न दिसणारी चिमणी म्हणजे पीतकंठ तिलाच रान चिमणी असे म्हणतात. ही चिमणी नाशिक शहराबाहेर जंगल परिसरात दिसून येते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना मृत चिमणी आढळून आली होती. त्यांनी तिला मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीत नेऊन तिचे परीक्षण केले. ती हाऊस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष समोर आला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो. म्हणून तिला पीतकंठ असे म्हणतात. ही चिमणी हरसूल, पेठ इगतपुरी येथे आढळून येते.

चिमण्याच्या आवाजाने पूर्ण परिसर हसून उठत असतो. चिमण्याच्या चिव चिवाटामुळे आपल्याला एक अल्हादायक वातावरणाचा अनुभव येत असतो. परंतु आज त्या चिमण्या या जगातूनच गायब होण्याच्या मार्गावर आहेत. आपण लहानपणी चिमण्याची गोष्ट ऐकली असेलच. गोष्टीतल्या चिऊ ताऊविषयी आपुलकी आणि प्रेम वाटू लागते. साधारण १४ ते १६ सेंटिमीटर असलेली नाजुकशी चिमणी आपल्याला नक्कीच आकर्षित करत असते. पण चिमण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने जागतिक स्तरावरील पर्यावरण व पक्षी प्रेमी चिंतेत आहेत. कबूतर आणि चिमण्या हे पक्षी मानवी वस्तीत जास्त आढळणारे पक्षी. आपल्या घराच्या परिसरात दिसणाऱ्या चिमणीला हाऊस स्पॅरो म्हणतात. या चिमणीसह भारतात पाच प्रकारच्या चिमण्या आढळतात. पण या चिमण्या दिवसेंदिवस गायब होत असल्याने जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे.

का गायब होत आहेत चिमण्या...?

चिमण्या गायब होण्यामागे अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्या कारणांपैकी आहे की, तुमच्या आमच्या जवळ असलेला फोन. हो, आपल्याला अधिक इंटरनेटवाला मोबाईल फोन हवा असतो. सर्वाधिक मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये चीनच्या पाठोपाठ भारताचा क्रंमाक आहे. त्यासाठी अधिक लहरी असलेले मोबाईल टॉवर्स कंपन्या उभारत असतात. काही दिवसांपुर्वी रोबोट २.० हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हाच विषय मांडण्यात आला होता. मोबाईल टॉवरमुळे पक्ष्यांचा जीव कसा जात आहे, याच सुंदरपणे रेखाटणं या चित्रपटात करण्यात आले होते. माबाईल टॉवरमधून उत्पन्न होणाऱ्या लहरींमध्ये अंडी नष्ट करण्याची क्षमता असते. चिमण्याच्या संख्येत घट होण्यामागे हे एक महत्त्वाच कारण आहे. शास्त्रज्ञांच्या मते, अँड्रॉईड, आयफोन्स, यासारख्या अत्याधुनिक फोनमधून निघणारी किरणे नैसर्गिक जगावर परिणाम करत आहेत.

वृक्षतोड : आपण आपल्या निवारासाठी किंवा इतर विकासाच्या कामासाठी वृक्षांची सर्रासपणे वृक्षतोड केली आणि अजून करत आहोत. यामुळे आपला तर निवारा झाला पण त्या वृक्षावर राहणाऱ्या पक्षांचे काय?

आपण त्याविषयी अजिबात विचार करत नाहीत. वृक्षतोडीचा थेट घरट्यांवर विपरित परिणाम होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्याही घटत चालली आहे. संख्येत विलक्षण घट झाल्याने चिमण्यांना संकटग्रस्त प्रजातींच्या सूचित चिमण्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या चिमणीला विद्युत चुंबकीय उत्सर्जनाबरोबरच हवामान बदल आणि प्रदुषणाचा धोकाही वाढला आहे.

माहिती स्रोत : वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६

श्री. सलिल परांजपे, देशदूत नाशिक

PDF डाऊनलोड करा.

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

 शहीद दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️ 23-मार्च-शहीद-दिन-भाषण

🎙️ क्रांतिकारक-भगतसिंग-परिचय

🎙️ हुतात्मा-सरदार-भगतसिंग

🎙️ सरदार-भगतसिंग-विचार

🎙️सरदार -भगतसिंग-व-लेनिन

🎙️ सरदार -भगतसिंग-व-गांधीजी

🎙️ शहीद-भगतसिंग-हिंदी-माहिती

🎙️ शहीद-भगतसिंग-इंग्रजी-माहिती

🎙️क्रांतिकारक-सुखदेव-माहिती

🎙️क्रांतिकारक-राजगुरू-माहिती

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post