सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम... !!
स्वातंत्र्याच्या सुवर्ण
इतिहासात,
अन इतिहासाच्या पानावर |
क्रांतिकार्याच्या शौर्याने,
ठसा उमटवला जन-मनावर ||
वरील ओळी ज्यांच्या
हौतात्म्याला सार्थ ठराव्यात व ह्याच शब्दरूपी अभिवादनातून ज्यांच्या सर्वोच्च
बलिदानाला लक्ष लक्ष नमन करावे असे शहीद सरदार भगतसिंग, शहीद सुखदेव रामलाल थापर व शहीद शिवराम हरी राजगुरू ह्या महान क्रांतिकारकांना
२३ मार्च १९३१ रोजी लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आले.
म्हणून हा दिवस "शहीद दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.
PDF डाऊनलोड करा.
देशासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपले सर्वस्व वाहिले, त्यांचे गीत गाताना कवी म्हणतात...
सोडिले सर्व घरदार,
सोडीला सुखी संसार.
ज्योतीसम जीवन जगले,
ते अमर हुतात्मे झाले.
जे देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले... !!
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्मा सरदार भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन करून आजच्या शहीद दिनाच्या कार्यक्रमास मी श्री. / सौ. _____________ सुरुवात करतो / करते.
आजाद भारत के लाल हैं हम
आज शहीदों को सलाम करते हैं |
युवा देश की शान हैं हम
अखंड भारत का संकल्प करते हैं ||
● अध्यक्षीय निवड :
ज्यांची उपस्थिती वाढविते
आजच्या कार्यक्रमाची शान
स्विकारुनी आमुची विनंती
आपण भुषवावे अध्यक्षस्थान
विद्यार्थी मित्रांनो योजीलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेले / असलेल्या व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या श्री. / सौ. ___________ यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
( सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे )
तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व त्यांचा बहुमूल्य वेळ खर्च करून आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री. / सौ. __________ यांचेही याठिकाणी स्नेहपूर्वक स्वागत करतो.
● दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शहिदांच्या प्रतिमेंचे पूजन व दीपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.
(दीपप्रज्वलन करतांना खालील ओळींचे वाचन करावे)
स्वातंत्र्याची ज्योत तेवत
ठेवली मनी
नाव तुमचे अजरामर झाले फासावर चढुनी
स्वातंत्र्यलढ्यात स्वतः सहभागी होवून शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी भारतभूमीला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक देखील तयार केले होते. अशा सर्व हुतात्म्यांचेदेखील आपण स्मरण व अभिवादन करूयात.
चलो फिर से आज वो नजारा याद
करले,
शहीदों के दिलो में थी जो वो
ज्वाला याद करले,
जिसमे बहकर आजादी पहुची थी
किनारे पे,
देशभक्ति के खून की वो धारा याद करले ||
खुशनसीब है वो लोग,
जो वतन के लिए शहीद जाते है l
मर कर भी वो लोग,
देश के लिए अमर हो जाते हैं ll
कृपया सर्व मान्यवरांनी कृपया
आसनस्थ व्हावे... धन्यवाद !!
● प्रास्ताविक :
सुख दुःखाच्या छायेतून
कळते
जसे सार अवघ्या जीवनाचे
आत्मा कार्यक्रमाचा
दर्शविते
तसे हे महत्व प्रास्ताविकाचे
आजच्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. / सौ. _______ यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो...
शहीद दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो...
स्वातंत्र्याची ज्योत तेवत
ठेवली मनी
नाव तुमचे अजरामर झाले फासावर चढुनी
विद्यार्थी मित्रांनो... आज २३ मार्च, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची पुण्यतिथी. २३ मार्च १९३१ रोजी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. हाच दिवस 'शहिद दिन' म्हणून ओळखला जातो. आणि ह्याच वीरांच्या बलिदानाचे स्मरण व त्यांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आज आपण सर्व येथे जमलो आहोत.
वयाच्या २३ व्या वर्षीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणारे सरदार भगतसिंग... सरदार भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते.
वीर सावरकरांचा
प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स
- १८५७' भगतसिंगांना
तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर
त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत
घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा
मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले.
अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते.
लाला लजपत राय
यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने
साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण
फरारी झाले. क्रांतिकारकांचे
म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे
यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर
संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत
चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ
उडवून दिला. स्वतःहून अटक करून
घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना
फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते
तिघेही हसत हसत फासावर चढले.
भगतसिंगांनतर दुसरे
हुतात्मे होते सुखदेव रामलाल थापर... सुखदेव थापर यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी लायलपूर (लुधियाना) येथे झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात
लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर
बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता
म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा
करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात
सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३
मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.
सरदार भगतसिंग व सुखदेव यांच्या सोबत फाशी देण्यात आलेले तिसरे हुतात्मे म्हणजेच शिवराम हरी राजगुरु हे होय. राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
लाहोर जेल मध्ये
फाशीच्या वेळी "हे तिघेही "मेरा रंग दे बसंती
चोला..." हे गीत गात गात हसत मुखाने फासावर
गेले. म्हणूनच भारताच्या
स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात २३ मार्च हा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे.
या घटनेप्रसंगी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपला जीव
गमावला. त्यातील भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे अग्रस्थानी होते.
आजच्या या शहीद
दिनी आपण ह्या थोर आणि महान क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या
बलिदानाला सलाम करण्यासाठी येथे जमलो आहोत. शहीद दिनानिमित्त आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची जाणीव ठेवावी तसेच
त्यांचे हे सर्वोच्च बलिदान हे आपल्यासाठी आणि आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच
प्रेरणादायी असेच आहे.
त्यांच्या निस्सीम देशभक्तीला व हौतात्म्याला कोटी कोटी नमन !!
खुशनसीब है वो लोग
जो वतन पर मिट जाते है
मर कर भी वो लोग
देश के लिए अमर हो जाते हैं ll
इतके बोलून मी माझ्या प्रस्ताविकास पूर्णविराम देतो/देते.
जय हिंद, जय भारत !!
● विद्यार्थी व शिक्षक भाषणे :
( प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत. )
● अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :
तेज तुमचे आहे, सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या मार्गदर्शक शब्दांतच आहे, जीवनाचे संपूर्ण शास्त्र
ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून, कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे, अध्यक्षीय मार्गदर्शनाचा
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. _________ यांनी करून त्यांच्या अनुभावाच्या / ज्ञानाच्या कुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी व भरभराटीसाठी मार्गदर्शक ठरतील.
मी त्यांना विनंती करतो /
करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत...!! धन्यवाद !!
● आभार प्रदर्शन :
माझे सहकारी शिक्षक / शिक्षिका श्री. / सौ. _______ यांनी आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी ________ विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
ज्ञानकुंभ रिता करुनी, अनमोल-प्रेरक ज्ञान दिले,
बोधामृत पाजूनी ज्ञानाचे, आम्हा उपकृत केले.
तुम्ही पाठीराखे आमुचे, सदा तुमचाच आधार,
मार्गदर्शन असू द्यावे नित्य, स्विकारुनी हे आभार
आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण, समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.
तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार
● समारोप :
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्या महान क्रांतिकारकांचे त्यांचे कार्य सतत स्मरणात ठेवून त्यांनी घालून दिलेली देशप्रेमाची शिकवण व देशाप्रती असलेला अभिमान आपण प्राणपणाने जपुयात. आणि निश्चितच हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
आजादी की हम कभी शाम नहीं होने
देंगे,
शहीदों की कुर्बानी कभी बदनाम
नहीं होने देंगे |
एक बूंद भी बची हो जब तक लहू की,
भारत माता का आंचल नीलाम नहीं
होने देंगे ||
आपला निरोप घेतांना शेवटी हेच म्हणावे वाटते...
आदर्शं बनें लाखो युवा के, जब तक रहेगा यह गगन।
भगतसिंह, सुख़देव, राजगुरु, हैं आपकों शत्-शत् नमन !!
आजच्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम / राष्ट्रगीताने होईल.
सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता होतेय असे मी जाहीर करतो / करते.
!! जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र !!
( सूत्रसंचालनातील काही भाग संकलीत असल्याने ज्ञात / अज्ञात कवींचे / लेखकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता. )
शब्दांकन : गिरीष दारुंटे , मनमाड
शहीद दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ शहीद-भगतसिंग-इंग्रजी-माहिती
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻