जागतिक योग दिन घोषवाक्ये
बना योगी, राहा निरोगी.
योगाची कास धरू
निरोगी जीवन जगू
नियमित योग करा,
जगणे आनंददायी करा.
नियमित योग जेथे
आरोग्य वसे तेथे
नियमित योग करूया,
शरीर निरोगी करूया.
नियमित योग करूया,
चला निरोगी राहूया.
योग आणि सकस आहार,
आहे निरोगी जीवनाचा आधार.
योगाला जोड प्राणायामची,
हीच शाश्वती निरोगी जीवनाची.
व्हाल एकाग्र, न चुकेल अवधान,
योग देईल जगण्याचे समाधान.
सातत्याने करा योग कृती,
निरोगी जीवनाची होईल उन्नती.
महान आपली संस्कृती परंपरा,
रोज योग करण्याचा देऊया नारा.
योग करून घडवूया क्रांती,
जगण्यात येईल सुख शांती.
नियमित योग आहे गुणकारी,
निरोगी जीवनाचे स्वप्न साकारी.
जो करेन नियमित योग,
त्याच्यापासून दूर राहील रोग.
योग आहे अवघ्या विश्वाची शान,
योगामुळेच भारताला जगात मान.
एक, दोन, तीन, चार,
चला योगाचा करू प्रसार.
योग करण्याचा निश्चय दृढ,
ठेवेल तुमचे आरोग्य सुदृढ.
वाढविण्यासाठी शारीरिक ऊर्जा,
चला योगाला देऊ पहिला दर्जा.
भारतीय संस्कृतीचे अमूल्य दान,
योग आहे विश्वाला वरदान.
जर घ्याल योगाचा आधार,
निरोगी जीवन घेईल आकार.
चला योगाची धरूया कास
जीवन निरोगी होईल हमखास
हवी असेल तन, मन, शांती
तर योग घडवेल जीवनात क्रांती.
!! घोषवाक्य निर्मिती !!
गिरीश दारुंटे, मनमाड
Copyright Disclaimer
वरील घोषवाक्ये स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
प्रार्थना व गीते डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻