शाळा प्रवेशोत्सव तसेच प्रभात फेरीसाठी उपयुक्त
घोषवाक्ये
• ६ वर्षाचे प्रत्येक
मुल शाळेत आलेच पाहिजे
• मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण
• शाळा शिकेल सुधारेल
जिवन
• चला चला शाळेला चला
• शाळा शिकायची बाई
आता घरी राहयचे नाही
• शिक्षण मिळेल तर
भविष्य घडेल
• चला चला शाळेत जावू,
घरी नका आता कोणी
राहू.
• झाली झाली शाळा सुरू,
आता सारे हसू खेळू.
• शाळा आहे आमची किती छान,
आम्ही रोज शाळेला जाणार.
• आधी विद्यादान, मग कन्यादान.
• देशाचा एकाच नारा,
निरक्षरांना साक्षर
करा.
• प्रगत जीवनाची नांदी,
लोकशिक्षण घडवेल क्रांती.
• जबाबदार पालकांचे लक्षण,
मुलांचे उत्तमशिक्षण.
• देशाचा होईल विकास,
घेउनी साक्षरतेचा
ध्यास.
• मुलगा, मुलगी एक समान,
द्यावे त्यांना शिक्षण छान.
• काळी माती जीवन दायी,
काळी पाटी, शिक्षणदायी.
• बालकांचे शिक्षण, देशाचे रक्षण.
• आमचा भारत साक्षर असो,
साक्षर भारत संपन्न असो.
• अंगठा नको, आता सही करू,
जीवनात आपल्या
परिवर्तन करू.
• गिरवू अक्षर, होऊ साक्षर.
• दिवसा पिकवू मळा,
रात्री शिकू शाळा.
• माता होईल शिक्षित,
कुटुंब राहील
सुरक्षित.
• वाचावे लिहावे, सुखाने जगावे.
• शिकाल तर टिकाल.
• लाजू नका, भिऊ नका,
शिकायची संधी सोडू
नका
• साक्षरतेचे एकाच ध्येय,
निरक्षरांचे दूर करा भय.
• मुलीला शिकू द्या, वाढू द्या,
माणूस म्हणून जगू
द्या.
• मोळी विक, पण शाळा शिक.
• मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
• आपल्या मुली जर शिकल्या छान,
होईल आपल्या देशाचे कल्याण.
• जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.
• आता मनाशी ठरवा पक्कं,
शिक्षण हा मुलींचाही हक्क.
• मुलगा मुलगा दोघे समान,
दोघांनाही शिकवू छान.
• मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन.
• बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू.
• शिक्षण घेऊन होऊ विचारी,
घेऊ आम्ही उंच भरारी.
• घडविण्या राष्ट्राचा विकास,
मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास.
• सोडून द्या वाईट चालीरीती,
आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती.
• आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच
लक्ष्य.
• नियमितपणाची धरूया कास,
मुलींना शिकवू एकच ध्यास.
• सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध,
मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद.
• जिच्या हाती पेन्सिल पाटी,
तीच सुखाचे मंदिर गाठी.
• मुलासह मुलीलाही देता शिक्षण,
जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण.
• शिक्षणाचा झाला आता कायदा,
त्यामुळेच होईल मुलींचा फायदा.
• कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर,
मुलींना करा शिक्षणाचा आहेर.
• नको पैसा नको सोने चांदी,
मुलींनाही द्या शिकण्याची संधी.
• मंत्र आहे नव्या युगाचा,
मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा.
• उद्याचा खरा आधार हि अक्षरे हे आकडे,
कणाकणांनी ज्ञान घेऊन चला नव्या शतकाकडे.
• कळी उमलणार नाही जीवनरसावाचून,
मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून.
• मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी,
शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.
• आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची,
मी शिकेन-
कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची.
• अंकूर फूलला कलिकेचा जन्म झाला,
अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला.
• काळ बदलला तूही बदललीस,
चूल-मूल चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस.
• भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी,
मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी.
• सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार,
डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार.
• बेटा-बेटी आहे समान,
दोघांनाही शिकवून
करूया महान.
• लडकी होने का गम नहीं,
लडकी लडके से कम नहीं।
• हम भारत की किशोरियों,
फूल भी है और चिंगारियाँ ।
• जब तक सुरज चाँद रहेगा,
ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा ।
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड
Copyright Disclaimer
वरील माहिती विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने दिलेली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
प्रार्थना व गीते डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻