लोकमान्य टिळक भाषण 2
अध्यक्ष महाशय, गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या बाल मित्र मैत्रीणीनो. आज २३ जुलै लोकमान्य टिळकांची जयंती. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते.
'बाळ गंगाधर टिळक' हे भारतातील एक महान नेते आणि राजकारणी होते. त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी कायद्याची पदवीही घेतली, पण या व्यवसायात हात घातला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले.
प्रथम त्यांनी एक शाळा काढली आणि त्यात ते शिक्षक झाले. त्यांनी 'केसरी' आणि 'मराठा' या दोन वृत्तपत्र काढली. या वृत्तपत्रांनी लोकांमध्ये राष्ट्रीय जागृती निर्माण केली. देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. ते लोकांना हिंसक कृत्यांसाठी प्रवृत्त करतात हे ब्रिटिश सरकारला समजले. त्यामुळे त्यांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे ठेवण्यात आले.
बाळ गंगाधर टिळक हे पहिले भारतीय नेते होते ज्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच." अशी सिंहगर्जना केली. ते संस्कृत आणि गणिताचे उत्तम अभ्यासक होते.
भारतभूमीच्या या महापुरुषास माझे कोटी कोटी नमन !
जय हिंद, जय महाराष्ट्र !
निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻