लोकमान्य टिळक भाषण 3
अध्यक्ष महाशय, गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या बाल मित्र मैत्रीणीनो. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे हि विनंती.
ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र होते. ते शिक्षक होते. लोकमान्य टिळकांचे वडील लहानपणीच वारले होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी अनेक शिष्यवृत्ती मिळवल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुषांमध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अत्यंत आदराने आणि श्रद्धेने घेतले जाते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळवणारच." असे त्यांनीच पहिल्यांदा सांगितले.
1879 मध्ये ते वकिलीची परीक्षा देखील उत्तीर्ण झाली होते. तरुणांमध्ये राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेत केसरी आणि इंग्रजी भाषेत मराठा या नावाने वर्तमानपत्रे काढली. या पत्रांतून त्यांनी ब्रिटीश राजवटीचे दुष्कृत्ये प्रसिद्ध केली. यामुळेच त्यांना चार महिने तुरुंगवास देखील झाला होता.
समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरे करण्यासाठी लोकांना प्रेरित केले. या उत्सवांच्या माध्यमातून त्यांना तरुणांमध्ये राजकीय जाणीव निर्माण करायची होती. त्यांना त्याच्या ध्येयात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले.
सततच्या मेहनतीमुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना अनेकवेळा तुरुंगवासही सहन करावा लागला. १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठी गर्दी होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दूरदूरवरून लोक आले होते. त्यांच्या मृत्यूच्या शोकासाठी अनेक दिवस बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या महापुरुषास माझे कोटी कोटी नमन !
जय हिंद, जय भारत !
निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻