स्वच्छता शपथ
महात्मा गांधींनी ज्या भारत देशाचं स्वप्न पाहिलं होतं त्यामध्ये केवळ राजकीय स्वातंत्र्य अभिप्रेत नव्हतं, तर एका स्वच्छ आणि विकसीत देशाचीही कल्पना होती. महात्मा गांधींनी गुलामीचे जोखड तोडून भारत मातेला स्वतंत्र केलं आता आपलं कर्तव्य आहे की सर्व घाण साफ करुन भारत मातेची सेवा करुया...
मी शपथ घेतो की, मी स्वतः स्वच्छतेच्या प्रती सजग राहील आणि त्यासाठी वेळ देईल. दर वर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यात 2 तास श्रमदान करुन स्वच्छतेच्या या संकल्पाला माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवेल. यापुढे मी कुठेही घाण करणार नाही आणि इतर कुणाला घाण करु देणार नाही.
सर्वात प्रथम मी स्वत:पासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या वस्तीपासून, गावापासून, माझ्या कार्यालयापासून या अभियानाची सुरुवात करेल. मी असे मानतो की जगात जे देश स्वच्छ दिसतात, त्या देशाचे नागरिक परिसरात घाण करत नाही आणि इतरांनाही परिसर अस्वच्छ करु देत नाहीत. या विचाराद्वारे मी गावा-गावांत आणि गल्लो-गल्लीत स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेल.
मी आज जी शपथ घेत आहे, ती अन्य 100 व्यक्तींनाही घ्यायला लावेन. अशा प्रकारे ते सुद्धा स्वच्छतेसाठी 100 तास देतील असा प्रयत्न मी करेन मला माहीत आहे की स्वच्छतेसाठी उचललेलं माझं एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी सहाय्यभूत होईल !
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/