जागतिक हात धुणे दिन
स्वच्छ धुवून आपले हात,
चला रोगांवर करूया मात.
आपल्या सभोवतालच्या परिसरात हानीकारक किटाणू असतात आणि हे किटाणू अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास, दुषित पाणी किवा अन्नातून, खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे, आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच पुढे मेंदू, फुफ्फुस्, यकृताचे दुर्धर आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते. अशा गंभीर आजारांपासून दूर राहायचे असल्यास आपण आपले हात नियमित व वेळोवेळी धुणे गरजेचे आहे.
■ हात कसे धुवावे ? :
हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा.
प्रथम हात पाण्याने ओले करुन त्यावर साबण घासावी.
दोन बोटांमधील जागा तसेच नखाच्या खालचा भाग व मनगटे घासावी.
हात धुण्याची क्रिया कमीत कमी 20 सेकंदापर्यंत चालने आवश्यक. हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे.
आपल्या मुलांसमोर किंवा शाळेत विद्यार्थ्यां समोर आपण वारंवार हात धुतल्यास मुले ते पाहून पाहून शिकतील.
■ हात कधी धुवावे ? :
जेवणाआधी व स्वयंपाकापुर्वी
शौचालयाचा वापर केल्यानंतर
झाडझूड केल्यानंतर
पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर
आजारी व्यक्तीच्या भेटीपुर्वी व नंतर
बाहेरुन खेळून, फिरुन आल्यानंतर
दुसऱ्यांच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यानंतर
हात धुण्याला कमी लेखू नका, त्याला आपली सवय बनवा, स्वच्छ हात धुतल्याने तुमचा डॉक्टरकडे जाण्याचा चक्कर, पैसा आणि वेळ वाचू शकते.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/