गर्विष्ठ मोर | मराठी बोधकथा | सुंदर बोधकथा | छोट्या बोधकथा | Marathi Bodhakatha | Garwishtha Mor | Marathi Short Stories | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

गर्विष्ठ मोर

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.

मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.

एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."

करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. 

तात्पर्य : दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

इतरही रंजक बोधकथा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📘 एक गरुड आणि घुबड

📙 सवयीचा गुलाम पोपट

📗 कुत्र्याची दूरदृष्टी

📕 हरीण आणि कोल्हा

📘 गर्विष्ठ मेणबत्ती

📙 अपमान आणि उपकार

📗 म्हातारी आणि वैद्य

📕 सेवा हाच धर्म

📘 अति लोभ नसावा

📙 कष्टाची कमाई

📗 पोपटपंची विद्या

📕 गर्विष्ठ मोर

📘 घोड्याला अद्दल घडली

📙 कोल्ह्याची फजिती

📗 पर्वत आणि उंदीर

📕 लांडगा आला रे आला

📘 जंगलाचा राजा लांडगा

📙 वाईट संगतीचे परिणाम

📗 स्वार्थी मांजर

📕 मुंगी व कोशातील किडा

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

Previous Post Next Post