एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. 'माणूस किती कृतघ्न असतो ? स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन पोहोचतो, धान्य संपले, मग मेंढया, मेंढया संपल्यावर बैल, कदाचित बैल संपल्यावर हा आपल्यालाही मारून खाईल, त्यापेक्षा आपण इथून पळून जाणेच चांगले' असा विचार करून कुत्रा तेथून पळून गेला.
तात्पर्य : अडचणीत सापडलेला मनूष्य स्वत:ची सुटका करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
इतरही रंजक बोधकथा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉