हरिण आणि कोल्हा...
एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी. '
तात्पर्य : दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
इतरही रंजक बोधकथा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉