मराठी राजभाषा दिन भाषण | मराठी भाषा गौरव दिन | कुसुमाग्रज भाषण | वि. वा. शिरवाडकर भाषण | Marathi Rajbhasha Din Speech

कुसुमाग्रज 

विष्णू वामन शिरवाडकर

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या

दरयाखोऱ्यातील शिळा

अशी शब्दपेरणी करून मायबोली मराठी भाषेचे पिक डौलाने उभे करणाऱ्या कुसुमाग्रज अर्थातच ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस.

मराठी साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल अवघ्या विश्वात 27 फेब्रुवारी हा दिवस "जागतिक मराठी भाषा गौरव दिन / मराठी राजभाषा दिन" इ. विविध नावांनी मराठीप्रेमी जन मोठ्या उत्साहात जगभर साजरे करत असतात.

वेगाने बदलत असणाऱ्या तंत्रस्नेही युगातही, आपल्या श्वासात मराठी मन जपणाऱ्या प्रत्येक मराठी प्रेमींसाठी हा दिवस म्हणजे एक पर्वणी व मराठीने दिलेल्या समृद्ध अशा संस्कृती व संस्कारांप्रती सहृदयतेने ऋण व्यक्त करण्याचा दिवसच असतो.

आपल्या कार्यकर्तृत्वाने मराठी साहित्य क्षेत्रात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलेल्या कुसुमाग्रजांचे योगदान हे येणाऱ्या कित्येक पिढ्यांनाही मराठी अस्मिता व भाषेविषयी अभिमान वाटावा असेच आहे. 

युवा पिढीसाठी चिरतरुण प्रेरणादायी अशी "कणा" ही कविता असो किंवा चित्रपट सृष्टीतील कोणत्याही कलाकारास अभिनय करण्यासाठी मोह पडावा असे अभिनयाचा कस लावणारे "नटसम्राट" ही नाट्यनिर्मिती असो, मराठी साहित्य क्षेत्रात असे कित्येक मैलाचे दगड त्यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट लेखणीतून साकारले व घडविले आहेत.

निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

© Copyright Disclaimer : वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

🔖 मराठी राजभाषा दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन

↪️  कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय

↪️  कुसुमाग्रज-जीवन-प्रवास

↪️  कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती

↪️  जन्म-मराठी-भाषेचा

↪️  मराठीची-बोलू-कौतुके

↪️  माझी-मातृभाषा-मराठी

↪️  मराठी-आमुची-मायबोली

↪️  मराठी-भाषा-गीत-डाऊनलोड

🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन

↪️  नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय

↪️  विज्ञान-म्हणजे-काय?

↪️  विज्ञान-हे-वरदानच

↪️  विज्ञानाची-वैशिष्ट्ये

↪️  MP3-विज्ञान-गीत-डाऊनलोड

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post