सन्माननीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज २७ फेब्रुवारी, म्हणजेच मराठी प्रेमींसाठी एक आनंदाचे पर्वच म्हणता येईल. होय, आज जागतिक मराठी राजभाषा दिन, यानिमित्ताने मी आपल्यासमोर जे दोन शब्द मांडणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे...
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी !
जाहलो खरंच धन्य
ऐकतो मराठी !
सुरेश भट यांनी लिहिलेल्या या मराठी भाषिकांच्या अभिमान गीताच्या ओळी कानी पडल्या की खरंच आपण किती भाग्यवान आहोत, याची प्रचिती आपल्याला येते.
आपली मराठी भाषा ही अतिशय लवचिक अशी भाषा आहे. एका शब्दाचे विविधांगी अर्थ देणारी आपली भाषा... मराठी.
आपल्या भारत देशात २९ राज्य आहेत. त्या प्रत्येक राज्याला स्वतःची अशी स्वतंत्र मातृभाषा आहे. महाराष्ट्र हे आपले राज्य आणि मराठी ही आपल्या राज्याची भाषा म्हणजेच आपली मातृभाषा आहे.
आपल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणारे लोक हे जगभरात विखुरलेले आहेत, तर मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाने बोलली जाणारी भाषा आहे.
२७ जानेवारी आपण सर्वत्रच मराठी मातृभाषा दिन, भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन अशा विविध नावांनी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. आपल्या मातृभाषेला मायबोली असेही म्हटले जाते. संस्कृत ही आपल्या मराठी भाषेची जननी आहे असंही म्हटलं जातं.
अनेक साहित्यिकांनी मातृभाषेतून म्हणजेच मराठी भाषेतून साहित्यनिर्मिती केलेली आहे. जसे की, कथा लेखन, कादंबरी लेखन, कहानी लेखन, नाट्यलेखन, काव्यलेखन व विविध कवितासंग्रह इत्यादी.
मराठी भाषा दिनानिमित्त सर्व शाळा महाविद्यालयांमधून विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. तसेच वकृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन देखील केले जाते.
आपल्या मराठी भाषेवरील प्रेम असेच अबाधित ठेवून तिच्या उत्कर्षासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे व जागरूक राहणे आवश्यकच आहे.
शेवटी आपला निरोप घेतांना एवढेच म्हणेन की...
माय मराठी ग मराठी
तुझे किती गुण गाऊ
भिजता तव शब्दसरींत
अवघे मराठीमय होऊ
जय हिंद, जय महाराष्ट्र !!
निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
© Copyright Disclaimer : वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
🔖 मराठी राजभाषा दिन उपयुक्त माहिती
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन
↪️ कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय
↪️ कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती
🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन
↪️ नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻