शिक्षक दिन सूत्रसंचालन | ५ सप्टेंबर सूत्रसंचालन | shikshak-din-sutrasanchalan

आगतम... स्वागतम... सुस्वागतम !!

आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. कारण आज आपण साजरा करीत आहोत, भारताचे महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान आणि भारताचे

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थातच ह्या दिवसाचे दुसरे महत्व म्हणजेच शिक्षक दिन !

शिक्षक हा केवळ शिकवणारा व्यक्ती नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक असतो. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अपयशातून यशाकडे नेणारा खरा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक !

आजच्या या मंगलमय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि शिक्षकांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो / करते.

शिक्षक दिन सूत्रसंचालन 1

DOWNLOAD PDF HERE

अध्यक्षीय निवड :

ज्या आदरणीय व्यक्तींच्या विचारांनी कार्यक्रमाला दिशा व श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, ज्या व्यक्तीच्या उपस्थितीने कार्याक्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होते, अशा मान्यवर व्यक्तीचे अध्यक्षपद कार्यक्रमासाठी निश्चितच भूषणावह असते.

आजच्या शिक्षक दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी अध्यक्षपदाची धुरा सोपवितांना शिक्षण क्षेत्राविषयी आस्था, विद्यार्थ्यांविषयी आपुलकी, शिक्षकांविषयी आदर आणि सामाजिक कार्याची जाण असलेल्या मा. यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे)

तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व त्यांचा बहुमूल्य वेळ खर्च करून आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले सन्मानीय श्री. / सौ. _________ यांचेही मी या ठिकाणी स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

शिक्षक दिन सूत्रसंचालन 2

DOWNLOAD PDF HERE

Previous Post Next Post