![]() |
शिवाजी महाराज मराठी माहिती |
शिवरायांचा राज्याभिषेक !!
सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, आज मी तुमच्यासमोर महान युगपूरूष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगावर प्रकाश टाकणार आहे.
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती म्हणूनच शिवरायांनी राज्याभिषेक करून घ्यावा असे त्यांचे जिजामाता मासाहेब व सगळे सहकारी सुचवत होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यास इतर राजे व सुलतान यांच्याकडूनही राजा म्हणून मान्यता मिळेल असे सगळ्यांचे म्हणणे होते. सर्वांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी ही मान्यता दिली.
रायगडाला राजधानीचे ठिकाण करण्याचे निश्चित झाले सोन्याचे रत्नजडित सिंहासन बनवले महाराज सिंहासनावर बसले की त्यांच्यावर धरण्यात येणारे रत्न मालिकांच्या व मोत्यांचे पांढरेशुभ्र छत्र तयार करण्यात आले. सात नद्यांचे पाणी आणून पवित्र जलाने भरलेले सुवर्णकुंभ तयार केले. काशीहून गागाभट्ट यांना सन्मानपूर्वक आणले. स्वराज्यातली प्रजा आनंदाने या सोहळ्यात सामील झाली होती.
राज्याभिषेकाचा दिवस उगवला. गडावर उभारलेल्या मंडपात सोन्याच्या चौरंगावर शिवप्रभू सोयराबाई व संभाजीराजे येऊन बसले राज्याभिषेकाचे मुख्य मंत्रोच्चार गागाभट्ट यांनी केले. गागाभट्टाने च्या हस्ते त्यांना राजवस्त्रे देण्यात आली. मासाहेबांना नमस्कार करून महाराज सिंहासनावर बसले त्यांच्या शेजारीच राणी व युवराज बसले. गागाभट्टांनी गजर केला...
क्षत्रिय कुलवंत, सिंहासनाधीश्वर, श्री शिवछत्रपती महाराजांचा... विजय असो !!
हा गजर होताच गागाभट्टांनी व सर्वांनी फुलांचा वर्षाव केला त्याच वेळी रायगडाच्या बुरुजावरून तोफा डागल्या. शिवराय छत्रपती झाले. या अविस्मरणीय दिवसाची तारीख होती ६ जून १६७४ शिवराय छत्रपती झाले आणि अवघे स्वराज्य आनंदून गेले.
अशावेळी म्हणावेसे वाटते...
शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी ॥
जय भवानी, जय शिवाजी ll
Copyright Disclaimer : वरील साहित्य स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती
शीर्षकावर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ सूत्रसंचालन-निर्मिती-गिरीश दारुंटे
↪️ Audio Flipbook-गिरीश दारुंटे
↪️ शिवजयंती प्रास्ताविक-गिरीश दारुंटे
↪️ चारोळ्या-निर्मिती-गिरीश दारुंटे
🎙️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे
↪️ शिवछत्रपती - स्वराज्याचे दैवत
↪️ महानयोद्धे शिवछत्रपती-इंग्रजी 1
↪️ राजे शिवाजी भोसले-इंग्रजी 3
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻