जिजाऊंची सुवर्णतुला | शिवाजी महाराज मराठी भाषण | शिवाजी महाराज मराठी माहिती | शिवाजी महाराज छोटी भाषणे | Shivaji Maharaj Marathi Speech
शिवाजी महाराज मराठी माहिती

जिजाऊंची सुवर्णतुला...!!

अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती...

दिवस होता पौष  अमावस्येचा... पौष अमावस्येला सूर्याला ग्रहण लागणार होते.

मासाहेब शिवरायांना म्हणाल्या, शिवबा या सूर्यग्रहणात मनसोक्त दानधर्म करण्याची आमची इच्छा आहे. स्मित हास्य करत शिवबा जिजाऊना म्हणाले, मासाहेब आमच्याही मनात एक इच्छा आहे.

कोणती इच्छा आहे शिवबा ? मासाहेबांनी प्रश्न केला.

शिवप्रभू म्हणाले, मासाहेब लोक मला महान, पराक्रमी, धाडसी, सर्वांशी प्रेमाने वागणारा राजा असे म्हणतात, पण हे सगळे संस्कार तुमच्यामुळे माझ्यात निर्माण झाले. शिवबा पुढे म्हणाले स्वराज्यस्थापनेचे जे कार्य माझ्या हातून झाले ते केवळ तुमच्या मुळेच. म्हणून माझी इच्छा आहे की या ग्रहणात तराजूच्या एका पारड्यात तुम्हाला बसवून दुसऱ्या पारड्यात सुवर्णतुला करायची. आणि मग ते सोने तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही दान करा . म्हणजे माझी ही इच्छा पूर्ण होईल आणि तुमची ही इच्छा पूर्ण होईल.

शिवरायांचे हे बोलणे ऐकून मासाहेबांचे डोळे भरून आले. त्यांनी शिवरायांचे म्हणणे मान्य केले. सूर्यग्रहण काळात  विधीपूर्वक मासाहेबांची सुवर्णतुला करण्यात आली.

तुमचे आमचे स्वतःचे "स्वराज्य" निर्माण करणाऱ्या शिवबांना मानाचा मुजरा !!


Copyright Disclaimer : वरील साहित्य स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती 

शीर्षकावर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  सूत्रसंचालन-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  Audio Flipbook-गिरीश दारुंटे

↪️  शिवजयंती प्रास्ताविक-गिरीश दारुंटे

↪️  चारोळ्या-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  शिवस्तुती-प्रेरणामंत्र

↪️  शिवजयंती-पोवाडा

↪️  शिवजयंती-फलक लेखन

🎙️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे

↪️  छत्रपती शिवरायांचे बालपण

↪️  शिवछत्रपती - स्वराज्याचे दैवत

↪️  युगपुरुष शिवाजी महाराज

↪️  शिवछत्रपती - रयतेचे राजे

↪️  शिवछत्रपती की जीवनी-हिंदी

↪️  महानयोद्धे शिवछत्रपती-इंग्रजी 1

↪️  अद्वितीय राजा-इंग्रजी 2

↪️  राजे शिवाजी भोसले-इंग्रजी 3


 📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post