हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा | शिवाजी महाराज मराठी भाषण | शिवाजी महाराज मराठी माहिती | शिवाजी महाराज छोटी भाषणे | Shivaji Maharaj Marathi Speech
शिवाजी महाराज मराठी माहिती

हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रीं ची ईच्छा...!!

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम छत्रपतीशिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा !

१९ फेब्रुवारी १६४५  रोजी शिवराय आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पुण्याच्या सह्याद्रीच्या शिखरावर असलेल्या रोहिडेश्वराच्या म्हणजेच शंकराच्या मंदिरात गेले. तेथील शंकराची पूजा करून शिवराय आपल्या मावळ्यांना म्हणाले, आपण जर एकत्र आलो आणि वेळ प्रसंगी सर्वस्वाचा त्याग देखील करायला तयार झालो तर सध्या सुरू असलेला अन्याय अत्याचार आपल्याला संपवता येईल.

सुखशांतीचे स्वराज्य निर्माण करता येईल. असे स्वराज्य व्हावे, ही श्रींची ईच्छा आहे. त्यामुळे असे कार्य आपण हाती घेतले तर आपल्या पाठीशी या जागृत  रोहिडेश्वरचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. पण त्यासाठी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी पडेल तो त्याग करण्याची शपथ आपण घ्यायला हवी. बोला तुमच्यापैकी कोण कोण तयार आहे? शिवरायांच्या ह्या बोलण्याने तिथे असलेले सर्व सहकारी मावळे एका सुरात म्हणाले राजे श्रींच्या इच्छेनुसार तुम्ही हाती घेत असलेल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात आम्ही आमचे प्राण पणाला लावू, तुम्हाला साथ देऊ, आपल्या सहकाऱ्यांकडून मिळालेले हे वचन ऐकून शिवरायांना आनंद झाला.

शिवरायांच्या सांगण्यानुसार मावळ्यांनी मंदिरात शंकराच्या पिंडीवर बेल पत्र हातात घेऊन  रोहिडेश्वर समक्ष स्वराज्य स्थापनेसाठी आपले जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.

अशा माझ्या स्वराज्याच्या लाडक्या राजास, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझे दोन शब्द संपवितो.

बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!


Copyright Disclaimer : वरील साहित्य स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती 

शीर्षकावर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  सूत्रसंचालन-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  Audio Flipbook-गिरीश दारुंटे

↪️  शिवजयंती प्रास्ताविक-गिरीश दारुंटे

↪️  चारोळ्या-निर्मिती-गिरीश दारुंटे

↪️  शिवस्तुती-प्रेरणामंत्र

↪️  शिवजयंती-पोवाडा

↪️  शिवजयंती-फलक लेखन

🎙️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे

↪️  छत्रपती शिवरायांचे बालपण

↪️  शिवछत्रपती - स्वराज्याचे दैवत

↪️  युगपुरुष शिवाजी महाराज

↪️  शिवछत्रपती - रयतेचे राजे

↪️  शिवछत्रपती की जीवनी-हिंदी

↪️  महानयोद्धे शिवछत्रपती-इंग्रजी 1

↪️  अद्वितीय राजा-इंग्रजी 2

↪️  राजे शिवाजी भोसले-इंग्रजी 3


 📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post