जागतिक महिला दिन प्रास्ताविक | महिला दिन माहिती | International Women's Day Preface | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

     महिला दिन प्रास्ताविक     

व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो...

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय  महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. | एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व जगातच, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच  स्त्रीवादाचा जन्म झाला. स्त्रीवाद किंवा फेमेनिझम हा मूळ फ्रेंच शब्द. तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला, तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली. आणि कमाल म्हणजे राणी व्हिक्टोरियाही या चेष्टेत सामील होती, तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता, पाप आणि महाचूक अशी त्याची संभावना केली.

मुळात, नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या. आणि मग आपल्या हक्कांबाबत | स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे.

महिला आणि संघर्ष जणूकाही हातात घालूनच येतात. पराकोटीच्या संघर्षातूनचमहिलांच्या कर्तृत्वाला झळाळी येते व त्यातूनच त्यांचे कार्यकर्तृत्व चमकून उठते. आजही नानाविध रुपात आपल्या कार्याचा ठसा उमटवीत असलेल्या स्त्री शक्तीला " नमन करणे हे आपले कर्तव्य आहे.

होय... इथे मी स्त्री ला शक्ती म्हटलंय !

स्त्रीची क्षमता सामर्थ्य आपण जाणतो वेदना सहन करण्याची ताकदही जास्त आहे स्त्रियांमध्ये ! नव्याने जगाची निर्मिती करण्याची क्षमताही स्त्रियांमध्ये ! वात्सल्य, ममता, चिकाटी, सहनशीलता दूरदृष्टी आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संकटांवर मात करून संघर्षात सर्वस्व पणाला लावून स्वतःला झोकून देऊन आपले योगदान व अस्तित्व सिद्ध करते ती " स्त्री " !

म्हणून म्हणावेसे वाटते.....

वेडात जगतात ज्या स्त्रिया,

त्या स्त्रियांचे अस्तित्वच निराळे...

लौकिक यश किर्तीच्या पलीकडे जाऊन

आपलं ध्येयाप्रत जगणं हि त्याचं निराळंच !

संयुक्त राष्ट्रांनी, आंतरराष्ट्रीय महिला वर्षापासून म्हणजेच 1975 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. सन 1977 मधे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करून घोषित करण्यात आले की, 8 मार्च हा संयुक्त राष्ट्रांचा महिला हक्क व शांतता दिन असेल. एकोणीसाव्या शतकात, जगभरातील स्त्री वादी चळवळीने जोर धरला होता, त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरुन चालणार नाही.

सतीप्रथा, केशवपन, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले. त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 तर मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली. स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळविलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला. स्त्रिया विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विषयांमधे सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या.

सन 1902 मधे रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अॅन्ड लिटररी क्लब'ची स्थापना केली तर 1904 मधे भारत महिला परिषदे'ची स्थापना झाली. या संघटना महिलांच्या | अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच प्रथम, संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्रियांना मतदानाबरोबरच निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या. भारतात मुंबई येथे ८ मार्च हा १९४३या ८ दिवशी पहिला महिला दिवस साजरा झाला.

स्वातंत्र्यानंतर, 1950 सालापासून भारतीय राज्य घटनेने, स्त्रियांना समानतेचा अधिकार | दिला आहे. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

स्त्रियांचा सन्मान सुरक्षितता व त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रती आदर ठेऊन आपण सर्वांनीच त्यांच्या सन्मानासाठी कटिबद्ध होऊयात. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो/देते.

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️जागतिक महिला दिन भाषण

🎙️ राजमाता जिजाऊ माँसाहेब 

🎙️ राजमाता अहिल्याबाई होळकर

🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

🎙️ भारतरत्न इंदिरा गांधी

🎙️ डॉ. आनंदीबाई जोशी

🎙️ समाजसेविका रमाबाई रानडे

🎙️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर 

🎙️ धावपटू कविता राऊत

🎙️ फ्लाईंग राणी हिमा दास

🎙️ कल्पना चावला मराठी

🎙️ कल्पना चावला इंग्रजी

🔖 जागतिक महिला  दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन 

↪️  ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण

↪️  आधुनिक-स्त्रीची-रूपे-भाषण

↪️  महिला-सबलीकरण-भाषण

↪️  स्त्री-शक्तीला-सलाम-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-घोषवाक्ये

↪️  जागतिक-महिला-दिन-शायरी

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण

↪️  महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण

↪️  लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post