गानसम्राज्ञी लता मंगेशकर
भारतरत्न ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेल्या लता मंगेशकर या भारतातील सुप्रसिद्ध गायिका होत. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर या शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकरांचे मूळ गाव मंगेशी हे आहे.
लता मंगेशकर या आपल्या आई-वडिलांची सर्वात मोठी कन्या होत्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची लहान भावंडे होत.
लता मंगेशकर यांना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी लता मंगेशकर यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लता मंगेशकर यांनी 'पहिली मंगळागौर' या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले आहे.
लता मंगेशकर या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ होती. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, २० हुन अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलेले आहे.
लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकराना भारताची गानकोकिळा म्हणतात. त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्य असा दादासाहेब फाळकेपुरस्कार मिळाला आहे. तसेच,
भारतरत्न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील त्या पहिल्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला.
लता मंगेशकर यांचे नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड् मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९९ च्या कालावधीत सर्वात जास्त गीते रेकॉर्डिंग उच्चांकासाठी नोंदवले गेले आहे. अशा या महान गायिकेचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस व कार्यास माझे कोटी कोटी प्रणाम!!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
🔖 जागतिक महिला दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन
↪️ जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक
↪️ ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण
↪️ महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण
↪️ लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण
कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻