जागतिक महिला दिन छोटी भाषणे | जागतिक महिला दिन माहिती | महिला दिन भाषणे | International Women's Day Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः।

यानुसार पूर्वापार स्त्रियांना भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान दिले गेले आहे .पण ते केवळ या श्लोका पुरतेच मर्यादित न ठेवता समाजाने त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे.

पूर्वी समाजात ' चूल आणि मूल ' हेच स्त्री चे कार्यक्षेत्र हा विचार रूढ होता. जुन्या चालीरीती, परंपरा या विचाराला खतपाणी घालत होत्या. बालविवाह, सतीची चाल, पडदा पद्धत या प्रथा स्त्रियांवर लागल्या गेल्या होत्या. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत काही थोर समाजसुधारकांनी आवाज उठवला आणि या प्रथा बंद पाडल्या.स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

यात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी सावित्रीबाईंना स्वतः शिकवले आणि मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रियांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली आणि खऱ्या अर्थाने स्त्रियांनी ज्ञानाच्या आणि स्वतः कलागुणांच्या जोरावर स्वतःचे स्वतंत्र असे अस्तित्व समाजात निर्माण केले. स्वत:चे कुटुंब सांभाळून जबाबदाऱ्या पूर्ण करत असतांना पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात स्त्रिया उत्तम कामगिरी बजावत आहे. देशाचा राष्ट्रपती पदापासून ते वकील, डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, पोलीस, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत.

नारीत शक्ती जगात भारी,

का समजता तिला बिचारी

म्हणजे आता स्त्रीला बिचारी समजण्याचा, अबला समजण्याचा काळ गेला असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच स्त्रियांनी स्वतःमधील गुण ओळखून येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे, स्वतःला मुक्त पणे व्यक्त करावे, तरच महिला दिनाचा खरा हेतू साध्य होईल. म्हणूनच शेवटी महिला दिनाच्या निमित्ताने एकच म्हणावेसे वाटते

नारी तू घे अशी भरारी,

फिरून पाहू नकोस माघारी,

ताकद तुझ्या मनगटात भारी,

 तूच आहेस नवदुर्गा नारी.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

🔖 जागतिक महिला  दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन 

↪️  जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक

↪️  ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण

↪️  आधुनिक-स्त्रीची-रूपे-भाषण

↪️  महिला-सबलीकरण-भाषण

↪️  स्त्री-शक्तीला-सलाम-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-घोषवाक्ये

↪️  जागतिक-महिला-दिन-शायरी

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण

↪️  महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण

↪️  लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण

कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️जागतिक महिला दिन भाषण

🎙️ राजमाता जिजाऊ माँसाहेब 

🎙️ राजमाता अहिल्याबाई होळकर

🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

🎙️ भारतरत्न इंदिरा गांधी

🎙️ डॉ. आनंदीबाई जोशी

🎙️ समाजसेविका रमाबाई रानडे

🎙️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर 

🎙️ धावपटू कविता राऊत

🎙️ फ्लाईंग राणी हिमा दास

🎙️ कल्पना चावला मराठी

🎙️ कल्पना चावला इंग्रजी

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post