हिमा दास
धिंग एक्सप्रेस - फ्लाईंग राणी
पूर्ण नाव : हिमा दास
राष्ट्रीयत्व : भारतीय
निवासस्थान : धिंग ( नागाव, आसाम)
जन्म : ९ जानेवारी २०००
देश : भारत
खेळ : मैदानी खेळ
खेळांतर्गत प्रकार : धावणे
प्रशिक्षक : निपुण दास
सुरुवातीचे जीवन : हिमा दासचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली.
शेतकऱ्याची मुलगी : हिमा दास ही आसाममधील नगांव जिल्ह्यातील धिंग या गावची राहणारी आहे. अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या हिमाने हे अनन्य साधारण श मिळवले आहे. हिमाचे वडील शेतकरी असून ते तांदळाची शेती करतात. कुटुंबातील सहा भावंडांमध्ये ती सर्वात छोटी आहे.
फुटबॉलमध्ये करायचे होते करिअर : खरं तर हिमा फुटबॉल खेळायची. तिला फुबॉमध्ये स्ट्रायकर म्हणून नाव कमवायचे होते. त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू होते. पण तिच्या कोचनी तिच्यातील गुण हेरले आणि तिला या क्षेत्रात आणले. विशेष म्हणजे तिने अवघ्या दोन वर्षांपूर्वी ट्रॅकवर पाऊल ठेवले होते. तिला अनेक आर्थिक अडचणी होत्या, पण कोचने तिला सर्वतोपरी मदत करत यशोशिखरावर जाण्यासाठी मदत केली. हिमा अॅथलिट बनण्यासाठी कुटुंबाला सोडून त्यांच्यापासून लांब 140 किलोमीटर अंतरावर राहत होती, असे तिचे कोच निपोन दास म्हणाले.
कारकीर्द : केवळ दोन वर्षांपूर्वी रेसिंग ट्रॅकवर उतरलेल्या हिमा दासने भारतासाठी कवर उतरलेल्या हिमादा मिळवलेले पहिले जागतिक सुवर्ण मुलामुलींमधील भेदभावांना मागे टाकणारे आहे.
जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने ५१.४६ सेकंदांची वेळ नोंदवली. या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली.
यापूर्वी भारताच्या कोणत्याही महिला किंवा पुरुष क्रीडापटुला ही कामगिरी करता आलेली नाही. अगदी मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांनाही ही कमाल करता आलेली नाही.
आसामच्या नागाव जिल्ह्यातील कांधुलिमारी गावाची हिमा अवघ्या देशाची सुवर्णकन्या ठरली आहे. तिचे कुटुंब शेतकऱ्यांचे आई-वडील यांच्यासह कुटुंबातील सहा सदस्यांचा उदरनिर्वाह शेतीतून चालतो. मात्र, या संघर्षमय जीवनाची जाण हिमाला लहानपणीच आली. पण म्हणून तिने स्वप्नं पाहण्याचं थांबवलं नाही. ती नेहमी सकारात्मक विचार करत राहिली. गावातील भाताच्या खाचरात एका शिक्षकाने तिला फुटबॉल खेळताना पाहिले. त्या वयातली तिच्यातली ऊर्जा पाहून ते थक्क झाले. त्यांनी तिला ताबडतोब अॅथलेटिक्समध्ये येण्याचा सल्ला दिला. नंतर तिची भेट निपोन दास या प्रशिक्षकांशी झाली. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या हिमाला पाहून दास यांनी तिच्यातील क्षमता हेरली आणि तिला गुवाहाटीला येण्याचा आग्रह धरला. घरापासून दीडशे किलोमीटर दूर मोठ्या शहरात पाठविण्यास पालक तयार नव्हते. मात्र, प्रशिक्षकांनी समजूत घातली आणि तिचा नवा प्रवास सुरू झाला. आज तिची चर्चा आहे ती तिने मिळवलेल्या यशाबरोबरच तिच्या धाडसाची. 'ही मुलगी काहीही करू शकते.' असा तिचा आसामात लौकिकच आहे सर्वदूर. याचे कारणही तसेच. तिने एकटीने धाडसाने स्वत:च्या आणि आसपासच्या गावांमध्ये दारूबंदी घडवून आणली आहे. 'हिमा खूप हट्टी आहे. एकदा का तिने एखादी गोष्ट ठरवली, तर ती कोणाचे काही ऐकत नाही. ती आत्मविश्वासाने भिडते मग.' असे तिचे वडील सांगतात. तिचा हा दृढनिश्चय तिला इथवर घेऊन आला आणि पुढेही सुवर्णमयी मार्गाने नेईल.
कामगिरी व किताब : २०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच हिमाने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. ५०.७९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करून तिने राष्ट्रीय विक्रम सुद्धा नोंदवला.
४ X ४०० मीटर धावणे मिश्र रीले : २०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या मिश्र रिले स्पर्धेत हिमा दास, एम. आर. पुवम्मा, मुहम्मद अनस, राजीव आरोकीया यांच्या संघाने रौप्य पदक पटकावले.
४ X ४०० मीटर धावणे महिला रीले : २०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमा दास, एम. आर. पुवम्मा, सरीता गायकवाड, व्ही.के. विस्मया यांच्या संघाने सुवर्णपदक मिळवले.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
🔖 जागतिक महिला दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन
↪️ जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक
↪️ ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण
↪️ महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण
↪️ लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण
कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻