सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित गुरुजनवर्ग, विद्यार्थीमित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
एक शिक्षक, उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.
या विशेष प्रसंगी, मी येथे जमलेल्या सर्व शिक्षकांना आणि ज्यांनी माझ्यावर संस्कार केले व मला ज्ञान दिले आहे अशा सर्व शिक्षकांना मी वंदन करतो.
आपल्या सर्वांना माहित आहे की 'शिक्षक' ची व्याख्या करणे अशक्य आहे कारण शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरते किंवा शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करण्यापुरते मर्यादित नसतात तर विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर जाण्यास मदत करतात. ते आपल्या चारित्र्यामध्ये मोलाची भर घालतात आणि आपल्याला देशाचे आदर्श व सुसंस्कृत नागरिक बनवतात.
दुसरे म्हणजे, शिक्षक हे आपले दुसरे पालक आहेत. आपल्यावर प्रभाव पाडण्यात आणि प्रेरणा देण्यात शिक्षकांची प्रमुख भूमिका असते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे अनुकरण करून त्यांना आदर्श मानण्याचा प्रयत्न करतो. पालकांनंतर, प्रत्येक टप्प्यावर मुलाचे चारित्र्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकच घेतात.
म्हणून, आज शिक्षकांना व त्यांच्या अथक प्रयत्नांना सलाम करून त्यांना शुभेच्छा देणे हे आपले परम कर्तव्य आहे. आपण सततच त्यांचा सन्मान करून आपल्याला घडविण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करूया. त्यांच्या अमूल्य प्रयत्नांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो.
शिक्षक हे मार्गदर्शक देखील असतात जे विद्यार्थ्याला जबाबदार नागरिक बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. ते मार्गदर्शक म्हणून देखील काम करतात. आपले ध्येय गाठण्यात शिक्षक सतत मदत करतात. त्यांचे योगदान केवळ शाळांपुरते मर्यादित नसून ते समाज आणि देशापर्यंत विस्तारलेले आहे. अशा प्रकारे, पालकांनंतर, शिक्षकांना योग्य आदर मिळायलाच हवा.
शिक्षक दिनाचा हा विशेष कार्यक्रम आपल्या शाळेत साजरा होतांना मला आनंद होत आहे.
हा दिवस विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी व शिक्षकांचे आभार मानण्याची एक उत्तम संधी देतो. मी उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवितो, धन्यवाद!
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!
भाषण निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
👨🏻🏫 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -परिचय
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदी
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 4
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 5
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 6
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 7
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 8
👨🏻🏫 शिक्षक दिन कविता
👨🏻🏫 शिक्षक दिन शायरी
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 4
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/