सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आजचा हा दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करण्याचा दिवस.
भावी पिढी घडविण्याचे काम होते ज्यांच्या हातून
संस्कारांचे बीज पेरता बालकांच्या मनामनातून
जगात सर्वदा आदरणीय ठरती शिक्षक
सदैव व्हावे त्यांच्या चरणी नतमस्तक
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं, कारण शिक्षक योग्य संस्कार व ज्ञान देऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
शिक्षक हे एकाच बागेत वेगवेगळ्या रूप आणि रंगाचे फुलं सजवणार्या माळ्याप्रमाणे असतात. विद्यार्थ्यांना काट्यांवर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आज प्रत्येक घरात तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून शिक्षा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं आणि ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिक्षक जिवाचे रान करत असतात. म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. अशा सर्व शिक्षकांना शतशः नमन! धन्यवाद !!
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
वरील माहिती विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
👨🏻🏫 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -परिचय
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदी
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 4
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 5
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 6
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 7
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 8
👨🏻🏫 शिक्षक दिन कविता
👨🏻🏫 शिक्षक दिन शायरी
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 4
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/