जीवन उद्धरिले तयांचे
जे होते दुबळे आणि दीन
ऋण फेडाया गुरुजनांचे
साजरा करूया शिक्षक दिन
सर्वप्रथम सर्व गुरुजनांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आजचा हा दिवस खास तुमच्यासाठी, तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी.
गुरू ब्रह्म गुरू विष्णू
गुरू देवो महेश्वरः
गुरू साक्षात परब्रम्ह
तस्माई श्री गुरुवे नमः
भारतीय संस्कृतीत फार पूर्वी पासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. अगदी महाभारत, रामायणात देखील याचे दाखले आहे.आपल्या जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, कारण आम्हाला या सुंदर जगात आणले म्हणून जीवनातील सर्वात पहिले गुरु आपले आई-वडील असतात. पण शिक्षक हे आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून शिक्षकही आपले गुरु आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते.
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान मार्गदर्शक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
आपण देखील या प्रसंगी सर्व गुरुजनांचे ऋण व्यक्त करूया...
भावी पिढी घडवणारे,
सदैव आदरणीय शिक्षक.
बीज पेरतात संस्कारांचे,
त्यांच्या चरणी मी नतमस्तक.
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
वरील माहिती विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
👨🏻🏫 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -परिचय
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदी
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 4
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 5
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 6
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 7
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 8
👨🏻🏫 शिक्षक दिन कविता
👨🏻🏫 शिक्षक दिन शायरी
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 4
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/