आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजन व येथे उपस्थित माझ्या बालमित्र- मैत्रिणींनो, आज आपण येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. शिक्षक दिनानिमित्त आज मी जे बोलणार आहे ते शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.
जगी आहे त्यांना मान,
घडविली ज्यांनी भावी पिढी,
असावे मुखी तुमचे गुणगान,
उभारली ज्ञानरुपी गुढी.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हे दुसरे पालक असतात. ज्ञानरुपी गुढी उभारून आपल्या आपल्या जीवनाला योग्य आकार देतात व सदैव मार्गदर्शन करतात.
एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याचे जीवन बदलू शकतो. समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. ते भावी पिढ्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनाची योग्य संस्कारमुल्ये रुजवून जडणघडण करतात आणि त्यांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत करतात.
शिक्षक दिन हा शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानण्याची संधी आहे. या शिक्षक दिनी, मी माझ्या जीवनातील प्रवासात ज्यांनी मला मदत केली ,त्या सर्व शिक्षकांचे मी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करू इच्छितो / इच्छिते. तुमचे प्रेम, आशिर्वाद सदैव पाठीशी असू द्या.
आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! धन्यवाद !!
!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
वरील माहिती विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.
सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
--------------------------------
👨🏻🏫 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -परिचय
👨🏻🏫 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हिंदी
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 4
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 5
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 6
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 7
👨🏻🏫 शिक्षक दिन छोटे मराठी भाषण 8
👨🏻🏫 शिक्षक दिन कविता
👨🏻🏫 शिक्षक दिन शायरी
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 1
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 2
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 3
👨🏻🏫 शिक्षक दिन इंग्रजी भाषण 4
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/