मलेरिया म्हणजे काय |  जागतिक मलेरिया दिन | जागतिक मलेरिया दिन माहिती। World Malaria Day


मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.

प्लाझमोडियम या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. .. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.

इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले कि मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर  पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टीनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डासांमध्ये प्लाझमोडीयम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.

कारणे :

यामध्ये दोन प्रमुख घटकांचा विचार केला पाहिजे. मलेरियाचे जंतू आणि त्यांचे वातावरण, तसेच ॲनॉफिलस जातीचे डास आणि त्यांचे वातावरण.

डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बव्हंशी आपल्या हिंदुस्थानात कलकत्ता आणि बंगलोर येथे केले. या संशोधनासाठी, इ.स. १९०२ चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.

रोनाल्ड रॉस (जन्म : अलमोडा, इ.स. १८५७) यांचे वडील, सर सी. सी. जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.

डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधी करण्यात आला असला, तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो व त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.

'ॲनोफिलिस अल्बिमनस्' जातीचा डास मानवी हातातून आपले खाद्य घेतांना. हा डास मलेरियाचा वाहक आहे.या डासांचे नियंत्रण हा मलेरिया रोखण्याचा परिणामकारक उपाय आहे.

इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाच्या जंतूंचे काय होते, कोणकोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांत फारशी प्रगती झाली नाही, तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. त्यांना दिसून आले की, डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते.

लक्षणे :

मलेरिया आजारात तपाचा चढ-उतार या आजारात मुख्यतः खालील लक्षणे आढळतात. 

थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.

थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो.

ताप कमी होताना घाम येऊन उतरतो.

ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो.

तापाबरोबर खूप डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात.

पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.

मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते. मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.

प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जायची दगवण्याची शक्यता असतेकाही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात.

प्रकार :

प्लाझमोडियम फाल्सिपॅरम

प्लाझमोडियम वायवॅक्स

प्लाझमोडियम मलेरिया

प्लाझमोडियम ओव्हेल

उपचार :

मलेरियावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यतः क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात. रुग्णात काही जटिलता नसल्यास तोंडाने औषधे दिली जातात जटिलता असल्यास शिरेवाटे औषधे टोचतात.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

أحدث أقدم