बटुग्रह | Dwarf Planet

बटुग्रह

सूर्यमालेत नेपच्यूनच्या पलीकडे कायपरच्या पट्ट्यात ग्रहांसारख्या अनेक खगोलीय वस्तू फिरतात, त्यांना बटुग्रह असे म्हणतात. बटुग्रह सूर्याभोवती फिरत असले, तरीही त्यांना पुरेसे वस्तुमान नसते. सेरेस, प्लूटो, हाउमीया, मेकमेक, एरिस हे त्यांच्यापैकी काही बटुग्रह आहेत.

विद्यमान बटुग्रह :

एरिस हा सर्वांत मोठा बटुग्रह आहे. त्याला ‘गॅब्रिएल ’ नावाचा उपग्रह आहे. प्लूटो हा दुसऱ्या क्रमांकाचा बटुग्रह असून, त्याला शेरॉन हा मोठ्या आकारमानाचा आणि निक्स व हायड्रा हे छोट्या आकारमानाचे उपग्रह आहेत. २००५ एफ्‌वाय९, सेदना, क्वेओअर या बटुग्रहांना उपग्रह नाहीत. २००३ EL६१ या बटुग्रहाला दोन अतिशय छोटे उपग्रह आहेत. प्लूटो या बटुग्रहाला पूर्वी ग्रहाचा दर्जा होता.

ग्रहांविषयी माहिती :

· बटुग्रह - सन 2006 पर्यंत प्लूटो या ग्रहास सूर्यमालिकेत नवव्या ग्रहाचे स्थान दिले होते. परंतु; आंतरराष्ट्रीय खगोल समितीने परीभ्रमणाबाबत केलेल्या नवीन नियमानुसार प्लूटोचे परिभ्रमन ग्रह नसल्यामुळे त्यास बटुग्रह असे नाव देण्यात आले आहे.

· लघुग्रह - मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान असलेल्या ग्रहाच्या पटयाला लघुग्रह असे म्हणतात. 

· अंर्तग्रह - बूध ते मंगळ या ग्रहांना अंर्तग्रह असे म्हणतात. 

· बर्हिग्रह - गुरुनंतरच्या इतर ग्रहांना बर्हिग्रह असे म्हणतात. 

· धूमकेतू - सूर्याभोवती लंबकार कक्षेत फिरणार्‍या, जास्त परिभ्रमन काळ असलेल्या खगोलीय वस्तूला धूमकेतू म्हणतात. 

· उल्का - जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बळामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. अशी वस्तू पृथ्वीच्या वातावरणातून पृथ्वीकडे येत असतांना वातावरणाशी घर्षण होवून ती जळते व प्रकाश निर्माण होतो. याला उल्का असे म्हणतात.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक