Tauktae Cyclone
तौक्ते चक्रीवादळ
सध्या चर्चेत असलेल्या वादळाला ‘तौक्ते’ हे नाव कसं पडलं?
जगभरात चक्रीवादळांना विशिष्ट नाव देण्याची पध्दत आहे.यामुळे चक्रवादळाची माहिती
ठेवणे सोपे जाते. यासाठी संपूर्ण जग सहा भागात विभागण्यात आले आहे.
उत्तर हिंदी समुद्र (North Indian ocean) या भागात भारातासह इतर देशांचा समावेश होतो.
बांगलादेश,
इराण,
मालदीव,
म्यानमार,
ओमान,
पाकिस्तान,
कतार,
सौदी
अरेबिया,
श्रीलंका,
थायलंड,
यू.ए.इ.,
येमेन
यामुळे या भागात एखादे चक्रीवादळ निर्माण झाले तर या तेरा देशांनी सुचवलेले एक नाव
भारतीय हवामान विभाग (Indian metrological department) या चक्रीवादळानां देते
वादळांना नावे कशी दिली जातत ?
हे तेरा देश प्रत्येकी 13 नावे सुचवतात (एकूण 169 नावे).
मे 2020 नंतर या नावांचा नवीन संच बनवण्यात आला आहे.
या नुसार मे 2020 नंतर आलेल्या चक्रीवादळांना या देशांनी सुचवलेली नावे त्या देशाच्या
वर्णानुक्रमे देण्यात येतील.
(उदा. मे 2020 नंतर जे पहिले चक्रीवादळ आले त्याला बांगलादेशने नाव दिले, दुसऱ्यास
भारताने, तीसऱ्यास इराण व जे तेरावे चक्रीवादळ येईल त्यास येमेन नाव देईल, पुन्हा हेच
चक्र सुरू होईल व मे 2020 नंतर जे 169 वे चक्रीवादळ येईल त्यास येमेन ने सुचवलेले नाव
देण्यात येईल.)
एका यादीतील तेरा नावे वापरून झाली की पुन्हा दुसरी यादी सुरू
चक्रीवादळाचे बारसे होण्यासाठी त्यांचा वेग 63 किमी प्रतितास पेक्षा अधिक किमान तीन
मिनिटे असावा.
तौते चक्रीवादळ वरील यादी वरून कळलेच असेल की हे नाव म्यानमार या देशाने दिले आहे,
त्या देशात आढळणाऱ्या स्थानिक पालीचे हे नाव आहे (सध्या पहिली यादी सुरू आहे, पाचवे
नाव पाहावे)
यादी वरून आपण हा देखील अंदाज लावु शकतो की पुढे येणाऱ्या चक्रीवादळाचे नाव "यास"
असेल आणि ते नाव ओमान ने दिलेले असेल.
तौक्ते चक्रीवादळ -Tauktae Cyclone
माहितीस्त्रोत : https://mausam.imd.gov.in