संत सेवालाल महाराज

संत सेवालाल महाराज

आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन अशी परंपरा आहे महाराष्ट्राच्या मातीला ससा पराक्रमाचा वारसा आहे. तसा संतांच्या विचाराचा गंधही आहे महाराष्ट्र भूमीत अनेक जातीधर्मातील साधू-संत प्रबोधनकार कीर्तनकारांनी जन्म घेतला महाराष्ट्राची जडणघडणच मूळी संतांच्या विचारातून झालेली आहे. त्यांच्या शिकवणीमुळे संपूर्ण समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे समाजातील वाईट चालीरीती अज्ञान जातीव्यवस्था नष्ट करण्याचे महत्कार्य संतमंडळींनी केले आहे.

संतांची ही शिकवण आजही आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याची आजही गरज आहे. महापुरुष व्यक्ती एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला येत असले तरी त्यांचे कार्य एका विशिष्ट जाती कधीच नसते. संत व महापुरुषांचा प्रत्येक श्वास सृष्टीतल्या प्रत्येक जीवासाठी असतो. समाजाला योग्य मार्गाला घेऊन जाण्याचे द्रष्टेपणा चे कार्य संत व त्यांचे विचार करीत असतात.

व्यापाराच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती करीत असताना संत सेवालाल महाराजांना भारतातील अनेक संतांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. त्यातून सत्याचा शोध घेऊन आपल्याला समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. ते समाजात संत सेवालाल महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म बंजारा समाजात मागे कृष्ण पक्ष ६१ म्हणजेच दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला. त्यांचा जन्म तेलंगणा राज्यातील गोलाल डोली, तालुका गुप्ती, जिल्हा अनंतपुर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धर्मणी होते. भीमा नाईक हे तांड्याचे नाईक होते.

संत सेवालाल महाराज यांचे एक संत म्हणून विचार करताना, त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील भगवान महावीर, संत कबीर, संत बसवेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्यापरीच आहेत. परंतु त्यांचे विचार अलिखित असल्याने पुस्तक स्वरूपात उशिरा आल्याने जगाला त्यांची फारशी माहिती नसावी. संत सेवालाल महाराजांचे विचार मानवतावादाची शिकवण देणारे आहेत. समाजातील भोळ्या समजुती अंधश्रद्धा व्यसनाधिनता आणि तिचे व्यवहार दया. भूतदया, निसर्गप्रेम, स्वकर्तृत्वावर विश्वास, सत्य, अहिंसा इत्यादींविषयी महान विचार, दोहे, कवणे व भजने या स्वरूपात प्रकट झाले आहेत, सत्य हाच खरा धर्म आहे. नेहमी त्याचे आचरण करावे. सत्य जाणणे यातच खरे जीवनाचे सार आहे. हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात...

सत्य धर्मलीनता ती रेणू सदासी बोलू हरवते

नसतोच समजून घेऊन सागर पार कर

भावार्थ : सत्य हाच खरा धर्म आहे. सत्याचे जीवनात नेहमी आचरण करावे. नम्रतेने लीनतेने इतरांशी वागावे. प्रत्येक गोष्टी आधी समजून उमजून घेऊनच मगच बोलावे. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवन रुपी भवसागर तरून जाल. अहिंसा म्हणजे केवळ कोणाच्या हत्या न करणे एवढेच नसून काया, वाचा आणि मनाने कोणालाही न दुखणे होय. गाय कितीही भाकड असली तरी तिला कधीच कसायाला विकू नका. देवी ही सर्वांची आई आहे. ती कधीच आपल्या मुलांवर कोपत नाही. दुःख पीडा त्रास देत नाही, तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या बकऱ्यांचा बळी देण्यापेक्षा नैवेद्य देऊन प्रसन्न करा. असा साधा सोपा मार्ग संत संत सेवालाल महाराज सांगतात.

वाढदिवस त्यांना साई वेस किती मुंगी जीवन साथी हे देवी माते या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचे रक्षण कर. वाडी वस्त्यातल्या मुंग्यांचे रक्षण कर, सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचे सूत्र जणू सेवालाल महाराज पुढील डोळ्यातून सांगतात...

हमारे जीवन मे लगा सको छो मत कोई के मत

कोई कमी तर ओळख भजे पूजा करणे नारायण

भावार्थ : प्रत्येक व्यक्तीत उपजतच ऊर्जा, शक्ती, सामर्थ्य, गुणवत्ता, बुद्धिमत्ता, योग्यता ही असतेच. त्यासाठी सर्वप्रथम माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. कोणीतरी येईल आणि माझे भले करील माझ्याने होणारच नाही. असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये. तुम्ही स्वतःचे जीवन प्रकाशमान करू शकता. अन्याय करणार्‍यांवर फटकारे ओढताना सेवालाल महाराज म्हणतात...

पाप सोबत जाये यम घरे, रोग फासो मोरे गये

भावार्थ : जे कपटनीतीचा व्यवहार करून लोकांना फसवतील, ते पापाचे भागीदार बनून नरकात जातील. चौर्‍यांशी लक्ष योनी तपमापी बनून भटकत राहतील. म्हणून कोणीही कपटनीतीचा व्यवहार करू नये. चोर, लुटारू माणसे समाजात असतील तर अशांतता पसरते, अराजकता माजते, लोकांना दुःख भोगावे लागते. त्यासाठी समाजात मेहनती नीतिवान व चारित्र्यसंपन्न लोकांचीच गरज असते.

संत सेवालाल महाराजांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने, दोहे सांगून समाजाला सन्मार्गाला ची जाणीव करून दिली आहे. संत सेवालाल महाराज निरक्षर असूनही त्यांनी समाजाला बुद्धी प्रामाण्य वादाचे वादाचे आणि विज्ञानाचे धडे दिलेले आहेत. त्यांची वचने, दोहे ही साध्या सोप्या व सरळ अशा बंजारा बोलीतील आहे. संत सेवालाल महाराज यांचे हे क्रांतिकारी अमृततूल्य विचार केवळ बंजारांपुरते मर्यादित न राहता इतर भाषेतूनही प्रकट व्हावेत. आपण सखोल वाचू आणि चिंतन करू तरी संपणार नाही, असेच संत सेवालाल महाराजांचे विचारधन आहे.

माहितीस्त्रोत : whatsapp समूह