शाळा प्रवेशोत्सव फेरी घोषवाक्ये

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड

• शाळा प्रवेशोत्सवावेळी तसेच फेरीसाठी उपयुक्त घोषव

आधी विद्यादान, मग कन्यादान.

• देशाचा एकाच नारा, निरक्षरांना साक्षर करा.

• प्रगत जीवनाची नांदी, लोकशिक्षण घडवेल क्रांती.

जबाबदार पालकांचे लक्षण, , मुलांचे उत्तमशिक्षण.

देशाचा होईल विकास, घेउनी साक्षरतेचा ध्यास.

• मुलगा, मुलगी एक समान द्यावे त्यांना शिक्षण छान.

• काळी माती जीवन दायी, काळी पाटी, शिक्षणदायी.

• आमचा भारत साक्षर असो, साक्षर भारत संपन्न असो.

• बालकांचे शिक्षण, देशाचे रक्षण.

• अंगठा नको, आता सही करू, जीवनात आपल्या परिवर्तन करू.

• गिरवू अक्षर, होऊ साक्षर.

• दिवसा पिकवू मळा, रात्री शिकू शाळा.

• माता होईल शिक्षित, कुटुंब राहील सुरक्षित.

• वाचावे लिहावे, सुखाने जगावे.

• शिकाल तर टिकाल.

• लाजू नका, भिऊ नका, शिकायची संधी सोडू नका

• साक्षरतेचे एकाच ध्येय, निरक्षरांचे दूर करा भय.

• मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.

मोळी विक, पण शाळा शिक.

मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.

• आपल्या मुली जर शिकल्या छान होईल आपल्या देशाचे कल्याण.

• जन्म दिला मातेने पालन केले पित्याने मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.

• आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण हा मुलींचाही हक्क.

• मुलगा मुलगा दोघे समान, दोघांनाही शिकवू छान.

• मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन.

• बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू.

• शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी.

• घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास.

• सोडून द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती.

• आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य.

• नियमितपणाची धरूया कास, मुलींना शिकवू एकच ध्यास.

• सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध, मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद.

• जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी.

• मुलासह मुलीलाही देता शिक्षण, जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण.

शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा.

• कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर, मुलींना करा शिक्षणाचा आहेर.

• नको पैसा नको सोने चांदी, मुलींनाही द्या शिकण्याची संधी.

• मंत्र आहे नव्या युगाचा, मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा.

उद्याचा खरा आधार, हि अक्षरे हे आकडे, कणाकणांनी ज्ञान घेऊन चला नव्या शतकाकडे.

• कळी उमलणार नाही जीवनरसावाचून, मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून.

• मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.

• आई बाबा मला शिकू द्या घाई नको लग्नाची मी शिकेन कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची.

अंकूर फूलला कलिकेचा जन्म झाला, अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला.

काळ बदलला तूही बदललीस चूल-मूल ची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस.

भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी, मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी.

सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार. NTE

• बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान.

• लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं।

• हम भारत की किशोरियों, फूल भी है और चिंगारियाँ |

• जब तक सुरज चॉंद रहेगा, ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा ।