शुक्र ग्रह | Venus

शुक्र ग्रह 

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतरआणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.

शुक्र ग्रहाचे कक्षीय गुणधर्म

कक्षेचा कल : सूर्याच्या विषुववृत्ताशी

कोणाचा उपग्रह : सूर्य

वातावरण :

शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -४,६ आहे. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त तो ४७.८ अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. त्याची तेजस्विता ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सर्वांत जास्त असते त्यामुळेच त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असेही म्हणतात.

रचना :

शुक्र हा ग्रह घन पृष्ठभाग असणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. आकार व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिळताजुळता आहे इतका की कित्येकदा त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. शुक्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० कि.मी.ने कमी आहे तर त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे वातावरण मात्र अत्यंत दाट कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.

परिभ्रमण व परिवलन : 

शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. त्यामुळे शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०,८२,०८,९३० कि.मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे फिरतात. फक्त शुक्र आणि युरेेेेनस हे दोन ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिम दिशेला उगवतो व पूर्व दिशेला मावळतो. शुक्र हा देखील अंतर्वर्ती ग्रह असल्यामुळे याचेसुद्धा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते. शुक्राला एकही चंद्र नाही. शुक्र सूर्यापासून १०.६ कोटी कि.मी. आहे. बाकीच्या ग्रहांची कक्षा जरी लंबवर्तुळाकार असली तरी शुक्राची कक्षा मात्र जवळपास वर्तुळाकार आहे. त्याचा पृष्ठभाग ताशी ६.५ कि.मी. वेगाने फिरतोतर त्याचा पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळचा पृष्ठभाग हा ताशी १६०० कि.मी या वेगाने फिरतो.

पहाटतारा आणि सायंतारा :

शुक्र एकतर पहाटे पूर्व क्षितिजावर दिसतोकिंवा संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर. मात्रशुक्र जेव्हा सूर्यापासून ८-१० अंश अंतरावर असतोतेव्हा तो दिसत नाही. हे ज्या दिवशी घडते त्या दिवशीच्या पंचांगात शुक्राचा अस्त झाल्याची नोंद असते. साधारणपणे २० महिन्यांच्या काळात सूर्य ९ महिने पहाटे आणि ८-९ महिने संध्याकाळी दिसतो. इतर काळात तो दिसत नाही. अस्तकाळानंतर जेव्हा शुक्र पहिल्यांदा आकाशात दिसतो तेव्हा पंचांगात शुक्राचा उदय झाल्याची नोंद असते. शुक्राच्या उदयास्ताच्या व मार्गी-वक्री असण्याच्या तारखांचे गणित अत्यंत क्लिष्ट असल्याने या तारखांमध्ये सामान्य माणसाला अनियमितता जाणवते.

ज्योतिषशास्त्रातील शुक्र :

भारतीय ज्योतिषानुसार शुक्र हा लाभदायक ग्रह आहे. हा वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे. ज्योतिषान्वये शुक्र हा रोमान्सकामुकताकलात्मक प्रतिभाशारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ताधनआनंदप्रजोत्पत्तीस्त्रैण गुणतसेच ललित कलासंगीतनृत्यचित्रकला और मूर्तिकला यांचे प्रतीक आहे. ज्याच्या कुंडलीत शुक्र प्रबळ आहे त्याच्यात हे गुणदोष असण्याची शक्यता असते.

हस्तरेखा शास्त्रानुसार तळहातावर अंगठ्याच्या शेजारी जो उंचवटा असतो तो शुक्राचा असतो. ह्याची जास्त-कमी उंची व्यक्तीमधील प्रेमभावनाआकर्षणवासना और सौंदर्य यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती दाखवते.

शरीरशास्त्रातील शुक्र :

पुरुषाच्या वृषणांमध्ये जे पुरुषबीज असते त्याला शुक्राणू म्हणतात. हे वीर्य नावाच्या द्रवपदार्थाबरोबर सातत्याने शरीराबाहेर टाकले जातात.

 वक्री शुक्र :

चंद्र-सूर्य सोडले तर इतर सर्वच ग्रह वर्ष-दोन वर्षांतून किंवा अधिक काळातून कधी ना कधी वक्री होतात. म्हणजे आधीच्या नक्षत्रातून पुढच्या नक्षत्राच्या दिशेने जाण्याऐवजी ते मागच्या नक्षत्राकडे सरकतात. राहू आणि केतू सूर्याला विरुद्ध दिशेने प्रदक्षणा घालीत असल्याने नेहमीच वक्री असतात.

सूर्यमालेतील शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे. याचा व्यास १२१०४ कि. मी. आहे. या ग्रहास देखिल आंतर ग्रह म्हणतात. कारण हा ग्रह देखिल सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे. याच मुळे हा ग्रह देखिल आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो.

या ग्रहावरील वातावरण अतिशय दाट असल्याने सूर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो.

शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काल आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ यामध्ये मोठे वैशिष्ट्य जाणवते. शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.

शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८२०८९३० कि. मी. ( 0.72333199 A. U.) आहे. शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याच्या दिशेमध्ये कमालीचे वैशिष्ट्य आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह सारख्या म्हणजेच पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह विरुद्ध म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. याचा परिणाम असा शुक्रावर सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो.

सूर्याभोवती फिरताना त्याच्या सूर्याकडील बाजूचे तापमान सरासरी ७३० अंश असते.

शुक्र ग्रहाला बुध आंतरग्रह आहे. शुक्रावरून बुध फक्त सकाळी आणि सायंकाळी दिसू शकतो. शुक्राला देखिल एकही चंद्र नाही.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक