सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम... !!
सर्वप्रथम विद्यार्थी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर व आमच्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे मी श्री. / सौ. _____ मनपूर्वक स्वागत करतो / करते.
निरोपाचा क्षण नाही
शुभेच्छांचा सण आहे
पाऊल बाहेर पडतांना
रेंगाळणारे मन आहे
निरोप समारंभ.... शाळेला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंदके देणारे हळवे झालेले मन. शाळेने आजवर दिलेली शिकवण केलेले संस्कार व जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती हि सर्व शिदोरी घेवून हळव्या अंतकरणाने व जड पाऊलांनी शाळेची वेस ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजेच निरोप समारंभ, अर्थात तुमच्या हल्लीच्या डेकोरेटेड शब्दांतच सांगायचे झाले तर 'सेंड ऑफ'...!!
तुम्हाला आठवत असेलही किंवा नसेलही, परंतु जसे नववधु प्रथमच सासरचा उंबरा ओलांडून तिच्या घरात प्रवेश करते त्यावेळी तिच्या नजरेत सगळेच अनोळखी भासते. अगदी त्याच अनोळखी नजरेने व लाजऱ्या बुजऱ्या चेहऱ्याने तुमचा शाळेतील पहिला दिवस आम्हाला प्रत्येकाला आजही लख्खपणे आठवतोय. बघता बघता या लाजऱ्या बुजऱ्या सुरवंटांचे फुलपाखरु कधी झाले हे आम्हालाही कळले नाही. नेहमी प्रत्येक कार्यक्रमात जाणवणारा तुमचा किलबिलाट आज मात्र मावळलाय, जणूकाही आमची सर्व फुलपाखरे आमचा निरोप व आकाश कवेत घेण्यासाठी सज्ज झालीय अन हीच साक्ष आहे तुमच्या आमच्यातील विरहाची अन निरोप समारंभाच्या हळव्या क्षणांची.
अध्यक्षीय निवड :
अशा माणसांच्या सहवासात राहा
जे तुमच्या आयुष्याचा दर्जा वाढवतात
जे डोळ्यांतील भाव ओळखून,
शब्दातील भावना समजतात
अशीच माणसे मन जिंकून
कायम हृदयात राहतात.
अगदी असेच व्यक्तिमत्व लाभलेल्या व निरोप समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या श्री. / सौ. ----- यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे.)
दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.
सुमंगल वातावरणात
समईच्या उजळल्या वाती
मान्यवरांनी शुभहस्ते
प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती
मान्यवर परिचय व स्वागत :
अतिथींच्या आगमनाने झाले
वातावरण प्रसन्न उल्हासित
करुनी उपकृत आम्हा
स्विकारावे आमुचे स्वागत
माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा काचेसारखा पांढराशुभ्र असला की त्यात पाहणाऱ्याला स्वतःचे व इतरांचेही प्रतिबिंब स्वच्छ दिसते, अशीच प्रतिभा लाभलेले आजचे आपले मान्यवर...
(व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा.)
अध्यक्ष श्री / सौ.______________
प्रमुख पाहुणे : श्री. / सौ. _____________
(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे.)
प्रास्ताविक :
सुख दुःखाच्या छायेतून कळते
जसे सार अवघ्या जीवनाचे
आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते
तसे हे महत्व प्रास्ताविकाचे
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे श्री. / सौ. ______ करतील.
व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो...
देताना निरोप तुम्हाला
आले भरूनिया डोळे
स्मरता गतकालीन स्मृतींना
अंतरी आसवांचे हिंदोळे
____________________________________________________________________________________________________________________
विद्यार्थी व शिक्षक भाषणे :
(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विदयार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत.)
• अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :
तेज तुमचे आहे,
सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या शब्दातच आहे
जीवनाचे संपूर्ण शास्त्र
ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून
कळस गाठू प्रगतीचा
त्यासाठीच मान आहे
अध्यक्षीय मार्गदर्शनाचा
विदयार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सौ. ____ यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विदयार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विदयार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील.
मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विदयार्थ्यांसमोर मांडावेत... धन्यवाद !!
• आभार प्रदर्शन :
माझे सहकारी शिक्षक / शिक्षिका श्री. / सौ. ______ यांनी आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विदयार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी ________ विदयालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो / मानते व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
ज्ञानकुंभ रिता करुनी
अनमोल प्रेरक ज्ञान दिले
बोधामृत पाजूनी ज्ञानाचे
आम्हा उपकृत केले
तुम्ही पाठीराखे आमुचे
सदा तुमचाच आधार
मार्गदर्शन असू दयावे नित्य
स्विकारुनी हे आभार...
आपण केलेल्या मार्गदर्शनाचा, प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विदयार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण तसेच समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.
तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार
• समारोप :
अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला
एक नवी दिशा मिळाली
शेवटी आता समारोपाची वेळ आली...
अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो / करते.
!! जय हिंद - जय महाराष्ट्र !!
(सूत्रसंचालनातील काही भाग संकलीत असल्याने ज्ञात / अज्ञात कवींचे / लेखकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)
शब्दांकन : गिरीश दारुंटे, मनमाड
Disclaimer : वरील माहिती हि स्वनिर्मित असून, ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉