मराठी सुविचार संग्रह

 

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवाज्ञानाचा प्रकाश कुठुन येईल सांगता येत नाही.

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

मनाला आंनदसंस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.

आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?

जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.

आपण परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा परिस्थिती आपल्याला शरण आली पाहिजे.

अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.

शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.

गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळतेत्या सुखाचे नाव उत्साह !स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप.

क्रोध माणसाला पशू बनवतो.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.

केवड्याला फळ येत नसले तरीही त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामयमानाचे गरीब जीवन चांगले.

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला शिका.  

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.

खरे तेच बोलाउदात्त तेच लिहाउपयोगाचे तेच शिका आणि देशहिताचे तेच करा.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. / जशी दृष्टी तशी सृष्टी.

प्रेम लाभे प्रेमळांना त्याग ही त्याची कसोटी. / सत्तेपूढे शहाणपण चालत नाही.

लक्ष्मी सत्पुरूषाच्या घरी त्याच्या गृहिणीच्या स्वरूपात नांदत असते.

चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असतेम्हणून आहेत त्या मोडू नका.

निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे. / कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.

माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.

बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहेअहिंसा हे सबलांचे.

परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.

शहाणा माणूस चुका विसरतो पण त्याची कारणे नाही.

कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

प्रसिध्दी ही कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ.

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्ही तर ज्ञान तुमचेच रक्षण करते.

भरलेला खिसा माणसाला दुनिया रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो.

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

चुकण हि प्रकृती’, मान्य करण  ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही प्रगती’ आहे.

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

स्वतः चा विकास करालक्षात ठेवागती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नकास्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

मनुष्या जवळची नम्रता संपली कित्याच्या जवळची माणुसकीच संपली समजावे.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीभाषा गोड  तर माणसं तुटत नाहीत.

वाचलेली पुस्तकं आणि जीवनात भेटलेली माणसं माणसाला हुशार बनवतात.

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

शरीराला श्रमाकडेबुद्धीला मनाकडेहृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाचकौतुक प्रेरणा देतेतर टीका सुधारण्याची संधी.

स्वतःची तुलना इतरांबरोबर म्हणजे तुम्ही स्वतःचा अपमान करणे होय.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

अडचणीत असतांना दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे.

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा.

न हरतान थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही व यशस्वी होणारे कारण सांगत नाही.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

आपण काहीही करू शकतो पण सर्वकाही नाही करू शकत.

दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

अपयश म्हणजे संकट नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही स्वस्थ राहण्याने मात्र होते.

दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते. / असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रात्र होय.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

गौरव हा पडण्यात नाही पडून उठण्यात आहे.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.

इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

अनेक वेळा चांगले क्षण / आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नकात्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

स्वतःची भाषा स्वतःचे विचार आणि स्वतःवर सदैव विश्वास ठेवा.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

जोपर्यंत अंतःकरणात जिद्द आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे.

विचार निरोगी असले की सुविचार सुचतात.

सुविचार जीवनात दिपस्तंभाचे कार्य करतात.

जो गुरुला वंदन करत नाही त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही.

सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.

बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

खिडकी म्हणजे आकाश नसतं. / कविता म्हणजे भावनांचं चित्र होय.

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

वाचनमनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.

संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव आहे.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. / तुलना करावी पण अवहेलना करू नये.

समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नकाआहे तो परिणाम स्विकारा.

आवडतं तेच करू नकाजे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. / मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

आयुष्यात प्रेम करापण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही. / काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नकाकाही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

उक्ती आणि कृती यात भेद असू नये.

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

संकटं तुमच्यातली शक्तीजिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय म्हणजेच मौन होय.

अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. / अंथरूण बघून पाय पसरा.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. / मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच.

चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

जे झालं त्याचा विचार करू नये जे होणार आहे त्याचा विचार करा.

रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

गुणांचं कौतुक उशीरा होतं पण होत हे मात्र नक्की.

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र.

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आयुष्यात असे काही मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण मिळत नाही.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

दुसऱ्याच अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी.

स्वातंत्र्य म्हणजे संयम स्वैराचार नव्हे. / शिक्षण हे साधन आहेसाध्य नव्हे.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो.

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकतो.

जग हे कायद्याच्या भितीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

सद्गुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

मोहाचा पहिला क्षण हीच पापाची पहिली पायरी असते

जीवन नेहमीच अपूर्ण असते व ते त्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

जगात सारी सोंगे करता येतात पण पैशाच सोंग करता येत नाही.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसलं तरी सामना करणं त्याच्या हातात असतं.

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

क्रांती तलवारीने घडत नाही तर तत्वाने घडत असते.

जो गुरू असेल तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल तो गुरू नसेल.

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करा.

स्वातंत्र्य म्हणजे संयम असून स्वैराचार नव्हे.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

जीवनात तन्मयता व संयम नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करावा.

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हेत्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या

जगू शकलात तर चंदनासारखे जगा , स्वत: झीजा आणि इतरांना गंध दया.

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

आयुष्य जगून समजतेकेवळ ऎकून वाचून बघून समजत नाही.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

मोहाचा पहिला क्षणही पापाची पहिली पायरी असते.

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

जगात सारी सोंगे करता येतातपण पैशाच सोंग करता येत नाही.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात.

क्रांती तलवारीने घडत नाहीतत्वाने घडते.

जो गुरू असेलतो शिष्य असेलच. जो शिष्य नसेलतो गुरू नसेल.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहेसमुद्र गाठायचा असेलतर खाचखळगे पार करावेच लागतील.

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

वैभव त्यागात असतेसंचयात नाही.

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.

खोटी टीका करू नकानाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

मनाविरूध्द गोष्टम्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.

ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेलपण शत्रू निर्माण करू नका.

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

भव्य विचार हा सुगंधासारखा असतोतो पसरावावा लागत नाहीआपोआप पसरतो.

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येतेपण त्यासाठी संयम असावा लागतो.

कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

बनू शकलात तर कृतज्ञ बनाकृतघ्न नको.

विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.

जो स्वतःला ओळखत नाहीतो नष्ट होतो.

न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृतीभूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी

स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती !

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.

दुर्बल मनाचा मनुष्य कधीच हुतात्म होऊ शकत नाही.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्याचा अनादर करू नका.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा.

डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

प्रफ़ुल्लता हेच चेहऱ्याचे खरे सौदर्य . औदासिन्य चेहऱ्याला कुरूप बनवते .

अंतःस्थपणे जीवन संपन्न करते तेच खरे मनोरंजन .

शारीरिक सौदर्य़ कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौदर्य़ कधीच नष्ट होत नाही

ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय .

जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या

केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.

सहित्य ही उपासना आहेवासना नाही. ती वासना झाल्यास साहित्य अवनत होते .

वाड्मय हे देशाच्या घटनेचे आणि प्रगतीचे एक प्रभावशाली अस्त्र आहे .

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ 

निढळाचा घाम घाळून श्रमतो त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते.

एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.

माणासाला माणसाजवळ आणणे हीच खरी प्रगती.

समताधिष्ठीत समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्रत्येकाला प्रत्येकाला आहे

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा स्व’ तुम्हाला सापडेल.

* “ भाषा हे जर एक सुमन असेल तरव्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही 

माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.

जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तरमहान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे.

माणस असलेल्या घरात राहू नकामाणसाच्या घरात रहा.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीतआणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतंतेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात.

आपण का पडतो परत उठून उभे राहण्यासाठी.

आपण का अयशस्वी होतो परत यशस्वी होण्यासाठी.

मी कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,

पण मी कोणाचेतरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल.

जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.

एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.

पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असता.

आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते.

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडलीतर जीवनात दुःख उरले नसते.

जीवनात दुःखच नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.

संकलन : गिरीष दारुंटे मनमाड

व्ही. एन. नाईक हायस्कूल मनमाड ( नाशिक )