प्रभातफेरी घोषवाक्ये

!! प्रभातफेरी घोषवाक्ये !!

● भारत माता की जय ! भारत माता की जय !

● भारतीय स्वातंत्र्यदिनाचा विजय असो, विजय असो !

● भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, विजय असो !

● देश की दौलत हम सब बच्चे ! अच्छे बच्चे, साक्षर बच्चे !

● देश का निर्माण कौन करेंगे, हम करेंगे, हम करेंगे !

● देश की रक्षा कौन करेंगे, हम करेंगे, हम करेंगे !

● कश्मीर हो या कन्याकुमारी, हम सब सारे भाई-भाई !

● गंगा नदी का धो-धो पानी, हम सब सारे हिंदुस्थानी !

● सबसे न्यारा देश हमारा, उसका नाम भारत प्यारा !

● बेटा-बेटी एक समान, नर और नारी एक समान !

● भेद-भाव को नहीं सहारा, वह है भारत देश हमारा !

● कदम कदम बढाये जा, देश के गीत गाए जा !

● सारे शिकू या, देशाचा विकास करू या !

● मुलगा असो मुलगी, सर्वांना देऊ समान शिक्षण !

● स्वच्छता व शुद्ध पाण्याचे महत्व, ग्रामीण आरोग्याचा हाच मंत्र !

● स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी करू !

● पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा !

● पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी !

● नका जाऊ उघड्यावर शौचाला संधी मिळेल रोगराईला !

● सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट !

● पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे, दूषित होणार नाही मग हाताने !

● स्वच्छ घर, सुंदर परिसर, शोषखड्डयाचा करुया वापर !

● ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सदा !

● प्रश्न देशाच्या अस्मितेचा मार्ग स्विकारू स्वच्छतेचा !

● शुद्ध पाणी नियमित वापरू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू !

● पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेवू, सर्व रोगराईना दूर पळवू !

● स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती !

● वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ती !

● सदैव हातात मोबाईल फोन, उघड्यावर शौचाला बसलयं कोण !

● जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात !

● नखे कापा बोटाची, नाही होणार व्याधि पोटाची !

● असेल स्वच्छ दृष्टी, तर दिसेल स्वच्छ सृष्टी !

● शौचालय बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी !

● घाला सांडपाण्याला आळा, सर्व मिळून रोगाराई टाळा !

● स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर !

● शाळा स्वच्छ करा हातांनी, सुंदर गाणी गाऊ मुखांनी !

● गावकरी मिळुन एक काम करू, घरोघरी शौचालयाचा वापर करू !

● शौचालय असेल जेथे, खरी प्रतिष्ठा येईल तेथे !

● कचरा कुंडिचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू !

संकलन : गिरीष दारुंटेमनमाड