संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड
१) जर असेल कुटुंब लहान, तर मिळेल सुख महान.
२) लोकसंख्या शिक्षण म्हणजे राष्ट्रोन्नतीचे लक्षण.
३) विचार करा एकाचा मार्ग कुटुंब कल्याणाचा.
४) प्रश्न वाढता लोकसंख्येचा उपाय कुटुंब नियोजनाचा.
५) छोटे कुटुंब एकच मुल, तेच होईल सुगंधी फुल.
६) आजचे सर्वांचे प्रयोजन, चला करूया कुटुंब नियोजन.
७) कुटुंब नियोजनात कसूर, लोकसंख्येचा प्रश्न भेसूर.
८) कुटुंबाचा लहान आकार, सुखी जीवनाचे स्वप्न साकार.
९) सुखी संसाराचे सूत्र, कन्येला मना पुत्र.
१०) कुटुंब असेल लहान, होईल मेरा भारत महान.
११) खूपच वाढता महागाई, एकच मुल पुरे बाई.
१२) नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगा हवा.
१३) बालिका अथवा बालक, संपत्तीला एकच मालक.
१४) मुलगा असो वा मुलगी, दोघानाही द्या समान संधी.
१५) त्रिकोणातील तीन कोन, संतती एकच पालक दोन.
१६) एक कुटुंब एकच वारस, एकच अपत्य ठरेल सरस.
१७) हिंदू हो या मुसलमान, एक परिवार एक संतान.
१८) आमचा लहान परिवार, त्यात आनंद अपार.
१९) छोट्या कुटुंबाची आहे शान, सदैव उंचावेल जीवनमान
२०) छोटे कुटुंब सुखी कुटुंब, मोठे कुटुंब दुखी कुटुंब
२१)
कुटुंब पाहीजे इतके छोटे की लोकसंख्येचा प्रश्न सुटे.
२२) लोकसंख्या ठेवा नियंत्रीत, गरजा भागतील सुरळीत.
२३) करूया लोकसंख्येचे नियंत्रण, अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण.
२४) करा कुटुंब नियोजनाचा स्वीकार, अन्यथा होईल हाहाकार
२५) वैवाहिक सुखात नसे बाधा, पुरुष नसबंदीने कुटुंबकल्याण साधा.
२६) धरू नका मुलाची अशा, डोळ्यासमोर ठेवा पी. टी. उषा.