नागपंचमी | नागपंचमी सणाची माहिती | Nagpanchami-festival-information

श्रावण महिना सुरू झाला की, अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागपंचमी मराठी माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. असं मानलं जातं की, या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे.

लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नातं आहे. याच कारणांमुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते. खरंतर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्याही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं असल्यामुळेही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे. कारण शेतातील उंदरी-घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही. तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच, पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात. कुंडली दोषांमध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे. कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचंही महत्त्व सांगितलं जातं. शास्त्रांनुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. याशिवाय प्रत्येक महिनाच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे. परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची  पूजा विशेषतः केली जाते. या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबत साजरं केलं जातं.

आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमी विषयी माहिती (Nag Panchami Mahiti) वाचल्यास तुम्हाला कळेल की, फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे.

भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी, वनस्पती, एवढचं काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूज, पर्व, उत्सवांचं नातं हे धर्माशी जोडलं आहे. एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणांशीही जोडण्याचं काम करतात. याचनुसार नागाला दैवीप्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे.

नागपंचमीला भावाचा दिवस किंवा भैया पंचमी असंही संबोधल जातं. बहिणी आपल्या भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात. फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास ठेवला जातो. तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात. महाराष्ट्रात आजही मुली-सुना झाडांना झोके बांधून या दिवशी गाणी म्हणतात. नागाची पूजा करण्याआधी हाताला मेंदी लावतात. तसंच या दिवशी सुनांना माहेरीही पाठवण्याची प्रथा प्रचलित आहे.

नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टीचं कटाक्षाने पालन केलं जात असे. ज्यामध्ये त्या दिवशी शेतात नांगर न चालवणे, हत्यारं न वापरणं. पण आता नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते. तसंच या प्रतिमेला दूध, लाह्यांचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो. आजही बऱ्याच घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं दान करण्याचीही प्रथा आहे.

नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजण्याची काहीच आवश्यकता नाही. काही काळांपर्यंत नागपंचमीला गारूडी हे साप घेऊन येत असत आणि सापांना दूध पाजले जात असे. पण ते चुकीचे आहे कारण नाग दूध पित नाही. याउलट दूध पाजल्याने नागाचा मृत्यू होतो. आता मात्र संशोधन आणि लोकजागृतीमुळे या चुकीच्या प्रथांना विराम मिळाला आहे. तसंच नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये, काहीही कापू नये, तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जात असत. पण आताच्या काळात या गोष्टी शहरी भागात तरी पाळल्या जाणं शक्य नाही.

तुमची नागांवर खरंच श्रद्धा असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला दूधाचं दानही करू शकता. कारण ती खऱ्या अर्थाने नागपंचमी ठरेल.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

━━━━━━━━

दिनविशेषजयंतीपुण्यतिथी भाषणे व सूत्रसंचालन क्लिक करा.

👉🏻 www.girishdarunte.com

👉🏻 www.girishdarunte.in

━━━━━━━━

इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

━━━━━━━━

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

━━━━━━━━

أحدث أقدم