रशियाचे Luna-25 चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले | Luna - 25 Crashed

रशियाच्या चंद्र मोहिमेला मोठा झटका बसला आहे. भारताआधी चंद्रावर पोहचण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं आहे. रशियाचं लुनार मिशन (Russia lunar lander) लुना-25 (Lina 25) हे यानमध्ये काल (१९ ऑगस्ट) मोठा तांत्रिक दोष निर्माण झाला होता. आता चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना हे अंतराळ यान Luna-25 चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले आहे. लुना-25 विमान कोसळणे हा रशियासाठी मोठा धक्का आहे. 1976 नंतरची ही पहिली मोहीम होती जी रशियासाठी खूप महत्त्वाची होती.

नेमकं काय घडलं?

रॉसकोसमॉसने म्हटले आहे की लुना 25 मोहिमेच्या प्राथमिक तपासातून असे दिसून आले आहे की, युक्ती चालवण्याच्या वेळी वास्तविक आणि अंदाजित गणनांमध्ये विचलन होते. यामुळे हे यान अशा कक्षेत गेले जे अपेक्षित नव्हते. यामुळे ते चंद्रावर आदळले आणि कोसळले. एजन्सीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, '19 ऑगस्ट रोजी, लुना-25 फ्लाइट प्रोग्रामनुसार, प्री- लँडिंग लंबवर्तुळाकार कक्षेत बनवण्यासाठी वेग वाढवण्यात आला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.57 च्या सुमारास लुना-25 ची संपर्क यंत्रणा ब्लॉक झाली. त्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले लुना-25 :

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी डिव्हाइस शोधण्याचे आणि संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. Roscosmos च्या मते, डिव्हाइस ऑफ- डिझाइन कक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले आणि त्याचे अस्तित्व चंद्राच्या पृष्ठभागावरच संपले. रोसकॉसमॉसने सांगितले की, विशेष चौकशी आयोग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल.

10 तासापासून तुटला लुना-25 चा संपर्क :

फ्रेंच हवामानशास्त्रज्ञ आणि उल्का संशोधक फ्रँक मार्चिस यांच्या म्हणण्यानुसार सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे रोसकॉसमॉसचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न भंगल. या गडबडीमुळे लुना-ग्लोब लँडर उद्ध्वस्त झाले. तांत्रिक बिघाडानंतर सुमारे 10 तास लुना-25 शी संपर्क झाला नाही.

11 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आले होते :

रशियाची जवळपास 50 वर्षात अशी पहिली मोहीम करत आहे. रशियाने तब्बल ४७ वर्षांनंतर आपले यान अंतराळात पाठवले असून 11 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आले. लुना-25 बुधवारी यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहोचले मात्र, काल तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तज्ज्ञांचे पथक सध्या परिस्थितीचे विश्लेषण करत होतं. मात्र, दुर्देवाने ते यान आज कोसळलं.

रशियाचे इतके झाले नुकसान :

लुना-25 आपटल्याने रशियाला मोठा धक्का बसला. त्यांचा या मोहिमेवरील खर्च पाण्यात गेला. लुना - 25 साठी जवळपास 200 दशलक्ष डॉलर (16,63,14,00,000 रुपये) खर्च आला होता. रशियाचे हे मिशन फेल झाल्याने 16.6 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. या 200 दशलक्ष डॉलरच्या रक्कमेतून अवकाश यान, त्याचे प्रक्षेपण, या मोहिमेचे नियंत्रण, चंद्रावरील डेटाची जमावाजमव करण्यात येणार होती. पण मोहिमेच्या अगदी अखेरच्या टप्प्यात हा अपघात झाला. भारताची चंद्रयान-2 मोहिमेत सुद्धा अखेरच्या टप्प्यात अपयश आले होते.

चांद्रयान - 3 देखील पोहोचले चंद्राजवळ :

तर, भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शुक्रवारी सांगितले की, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या जवळ नेणारी डीबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि त्याची स्थिती सामान्य आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट रोजी अपेक्षित आहे

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

━━━━━━━━

दिनविशेषजयंतीपुण्यतिथी भाषणे व सूत्रसंचालन क्लिक करा.

👉🏻 www.girishdarunte.com

👉🏻 www.girishdarunte.in

━━━━━━━━

इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

━━━━━━━━

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

━━━━━━━━

أحدث أقدم