विद्यार्थी निरोप समारंभ 1 | विद्यार्थी शिक्षक भाषण | School Send Off Speech

निरोप समारंभ - निरोप घेतांना...!!

शिक्षक विद्यार्थी उपयुक्त माहिती

अनेकजण अनेक सुरांनी बोलतात की हल्ली शालेय मुलांना शाळेविषयी काही वाटत नाही, 'कुणी म्हणतं या नव्या पिढीला शिक्षकांविषयी काही आपुलकी नसते, पण नेहमीच हे खरं नसतं. नुकताच शाळेत दहावीच्या मुलांना ' सेंड ऑफ' देण्यात येतोय. हल्ली त्याला शुभेच्छा समारंभ म्हणतात. सेंड ऑफ झाल्यावर लगेच मुलांनी शाळेत काढलेले फेसबुकवर टाकलेले फोटो आणि त्याला मिळालेल्या कॉमेंट्स पाहिल्या आणि आश्चर्यच वाटलं. एक म्हणतो, ' शाळेबरोबर खूप काही संपलं यार' तर दुसरा म्हणतो, ' भाषण करताना फक्त रडायचं बाकी राहिलं होतं, तर कोणी म्हणतो, 'स्कूल, वी मिस यू लॉट' तर कुणी एकमेकांच्या फोटोंना टाकलेले फनी रिमार्क पाहून आपल्याही भावना शेअर करतो. शिक्षकांबरोबर काढलेले फोटो, सेंड ऑफ चालू असताना भाषण करणाऱ्यांचे काढलेले फोटो, ते बघून वाटणाऱ्या भावना ही मुले कदाचित प्रत्यक्ष बोलताना शाळेत असताना नसतील व्यक्त करत, पण म्हणून काही ते भावनाशून्य नसतात नक्कीच! या आधीच्या पिढीची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल.

त्या आधी आपण रडत रडत एकमेकांचा निरोप घेतला असेल आणि आता या मुलांच्या या भावना, या सर्वांच्या मागे नक्कीच समान सूत्र आहे. सर्वांच्या भावना सारख्याच आहेत फक्त व्यक्त करण्याच्या पद्धती, साधनं वेगळी!

शिक्षक : 

परवा बोलता बोलता एक विद्यार्थी म्हणाला, 'बाई तुम्ही दहावी वर्गात असताना वर्षभर आम्हाला खूप चांगली साथ दिलीत. समजून घेतलंत, म्हणून थँक्यू.' मला गंमत वाटली. वर्षभरात अभ्यास, शाळा, क्लास, घरचा अभ्यास, खेळ, टीव्ही, पालकांच्या व शिक्षकांच्या अपेक्षांचं ओझं सांभाळताना ही मुलं किती दमली असतील, तरी त्यातून वर्गातल्या किती किती गोष्टी यांनी सांभाळल्या. मला आठवतंय, एका विद्यार्थ्याची आई देवाघर गेली तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी मिळून त्याच्या घरी सांत्वनासाठी जाऊया असं मुलांनी मला सांगितलं. वर्गातल्या एका मुलाच्या हाताला फ्रॅक्चर झालं आणि त्याची परिस्थिती साधारण होती तर त्याला सर्वांनी मिळून आपणहून पैसे गोळा करून दिले.

शाळेला नाटकात कामे करण्यासाठी आणि रिहर्सलसाठी प्रसंगी अभ्यास बुडवून, पालकांचा ओरडा खाऊन जादा वेळ थांबण्याची त्यांची तयारी होती. खेळताना वर्गात मोडलेली खुर्ची भरून देण्यासाठी मित्राला मदत करायला एका पायावर हे सारे तयार होते. बाकावर काहीबाही लिहलं म्हणून मी ओरडल्यावर सर्वानी मिळून पैसे काढले आणि ऑइलपेंटचा छोटा डबा आणून दुसऱ्या दिवशी बाक छान रंगवून तयार ठेवलं. वर हसत हसत बाई आयडिया कशी वाटली म्हणून विचारायलाही त्यांना काही वाटतं नव्हतं. सेंड ऑफच्या दिवशी भाषण करताना त्यांना सर्वांनाच भरून आलं होतं आणि कार्यक्रम संपल्यावर खाऊ खाऊन झाल्यावर कितीतरी वेळ ते शाळेत रेंगाळत होते. पाय जड झाले होते. आता घरी जा, अभ्यास कर, असं सांगावं लागत होतं. पिढी नवीन आहे, पण शाळेचा निरोप घेतानाच्या भावना त्याच आहेत, भावस्पर्शी, मनापासूनच्या !!

शेवटी सेंड ऑफ म्हणजे काय ? तर...

निरोपाचा क्षण नाही;

शुभेच्छांचा सण आहे.

पाऊल बाहेर पडताना;

रेंगाळणारं मन आहे.

शाळेचा अखेरचा दिवस विसरणं अशक्यच :

आज शाळा सोडताना खूप वाईट वाटतंय, शाळेविषयी खूप आपुलकी आहे. पाचवी ते दहावीपर्यंत शाळेने आणि शिक्षकांनी खूप सांभाळून घेतलं. अभ्यासाशिवायच्या इतर उपक्रमात, स्पर्धात, कलाक्षेत्रात शाळेने खूप काही संधी मिळवून दिल्या. अनेकदा नाटकाच्या सरावासाठी शाळेने, शिक्षकांनी सांभाळून घेतले. शाळा संपल्यानंतरही शाळेला भेट देत राहणार आहे. आपण कितीही मोठे झालो तरी शाळेला विसरू शकत नाही.

शाळा सोडताना जुन्या आठवणी दाटून आल्या आहेत. मी पाचवीत असतानाचा पहिला दिवस आजही आठवतो आहे. दररोज शाळेत नियमित शाळेत येणे हे सवयीचे झाले होते. शाळेने आम्हाला अभ्यासाबरोबर कोणत्याही प्रसंगाला तोंड कसे तोंड द्यायचे, हे शिकवले. शाळेत असताना काही चुका केल्या त्याबद्दल आजही खेद वाटतो. नवीन आलेल्या शिक्षकांना इतर मुलांनी उचकवले, त्यात मीही सामील झालो होतो. परंतु, आजही ते आठवलं की तेव्हा असे करायला नको होतं, असे वाटतं. असे अनेक चांगल्या-वाईट अनुभवायची शिदोरी सोबत घेऊन पुढे जात आहोत.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा (प्रिलिम्स) संपल्या, की शाळा-शाळांमधून 10th students farewell कार्यक्रम आयोजित केला जातो आणि विद्यार्थीदेखील त्याची जोरदार तयारी करतात. पण हे सगळं करीत असताना त्यांच्या मनात संमिश्र भावना असतात. नवीन कॉलेजविषयी औत्सुक्य असतं, तर आपली शाळा आणि तेथील सुरक्षित वातावरणातून बाहेर पडावे लागणार याची रुखरुख असते. हे लक्षात घेऊनच या दिवशी संपूर्ण शाळा या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करतात, आत्मविश्वास निर्माण करतात आणि गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या मागे आहोत, हा विश्वास, आश्वासक आधारही देऊ करतात.

"आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, हे नक्की ठरवून त्याचा योजनापूर्वक पाठपुरावा केल्यास यश नक्कीच प्राप्त करता येईल. एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे की, आता केवळ गुणवत्ता हा निकष महत्त्वाचा राहिलेला नाही, तर एकंदरीत व्यक्तिमत्त्व, अवांतर वाचन, संभाषणकौशल्य, नेतृत्वगुण, समयसूचकता इ. गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण ती काळाची खरी गरज आहे." अशा तऱ्हेने शाळेने आजपर्यंत दिलेले आचारविचार केलेले संस्कार, देऊ केलेली सकारात्मक दृष्टी, जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा अशी समृद्ध शिदोरी घेऊन विद्यार्थी शाळेचा निरोप घेतात.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

━━━━━━━━

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

━━━━━━━━

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

━━━━━━━━

أحدث أقدم