जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१९६६ मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा झाला होता. संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) नोव्हेंबर १९६५ मध्ये त्याला एक विशेष दिन म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला होता.
१९६६ मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा झाला होता. संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) नोव्हेंबर १९६५ मध्ये त्याला एक विशेष दिन म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या पुढल्या वर्षी सप्टेंबर रोजी पहिला जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला. युनेस्कोच्या म्हणण्यानुसार 'साक्षरता दिन आंतरराष्ट्रीय समुदायाला साक्षरता हा मानवी हक्क असल्याची आठवण करून देतो. त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा पाया ठरतो.
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
विशेष : जगातील १२७ देशांपैकी साधारण १०१ देश असे आहेत जे संपूर्ण साक्षरतेच्या ध्येयापासून दूर आहेत. त्यात भारताचाही समावेश आहे, असे जागतिक संघटनेचे म्हणणे आहे.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड
