15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन मराठी | स्वातंत्र्य दिन मराठी सूत्रसंचालन | स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन | Independence Day Sutrasanchalan | 15 August Independence Day Anchoring | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

सुस्वागतम... सुस्वागतम ... सुस्वागतम...!!

स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने उगवलेल्या आजच्या या मंगलप्रभाती मी श्री. / सौ. ....... सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो / देते व स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतच असतो. परंतु आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजेच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभरात नेहमीपेक्षा अतिउत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करत आहोत.

हर घर तिरंगा उपक्रम देशभर उत्साहात साजरा होत असताना संपूर्ण भारतच तिरंगामय झालेला आपण आज बघत आहोत. नजर जाईल तिकडे प्रत्येक घरावर आपल्या देशाचा अभिमान, आपला राष्ट्रध्वज म्हणजेच आपला तिरंगा डौलाने फडकतांना बघताना उर अभिमानाने फुलून जात आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचे साक्षीदार आपण होणे हे नक्कीच  भाग्याची बाब आहे असेच मी म्हणेन !

भारताला स्वातंत्र्य मिळून आपल्या देशाला आज ........ वर्ष झालीत. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येकजण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत ब्रिटीशांच्या राजवटीतून मुक्त झाला. १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री तिरंगा फडकवण्यात आला व तिरंग्याच्या रुपाने स्वतंत्र भारताची नवी ओळख भारताला मिळाली.

तीन रंगांनी नटलेला,

तिरंगा आपली शान आहे.

पाहताच संचारे चैतन्य अंगी,

तिरंगा अमुचा पंचप्राण आहे.

तिरंगा....! ज्यातील प्रत्येक रंग म्हणजे भारताच्या वैभवसंपन्नतेचे व सामर्थ्याचे प्रतिक, केशरी रंग साहस व बलिदानाचे प्रतिक, पांढरा रंग सत्यता व शांततेचे प्रतिक तर हिरवा रंग श्रद्धा व शौर्याचे प्रतीक आहे. सोबतीलाच 24 आर् याचे निळ्या रंगाचे चक्र जणूकाही भारताची अविरत होणारी प्रगतीच दर्शविते. हाच तिरंगा अखंड भारताच्या बंधुत्वाची व एकोप्याची ओळख करून देतो.

आजाद भारत के लाल हैं हम

आज शहीदों को सलाम करते है।

युवा देश की शान हैं हम

अखंड भारत का संकल्प करते है ॥

अध्यक्षीय निवड :

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आपणा सर्वाना सुपरिचीत असलेले व त्यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवलेले श्री. / सौ. ....... यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन द्यावे.)

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले सन्मानीय श्री. / सौ. ...... यांचेही मी या ठिकाणी स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

ध्वज पूजन / प्रतिमा पूजन / दीपप्रज्वलन :

उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो / करते कि त्यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे.

सुमंगल या वातावरणात

संचारुनी आली देशभक्ती

मान्यवरांनी शुभहस्ते

प्रज्वलीत कराव्या ज्योती

मोहब्बत का दूसरा नाम हैं मेरा देश

अनेक में एकता का प्रतिक हैं मेरा देश

चंद गैरों की सुनना मुझे गँवारा नहीं

हिन्दू हो या मुस्लिम सभी का प्यारा है मेरा देश

यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ............... यांनी ध्वजस्तंभाचे पूजन व तदनंतर ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

( मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी, ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने / एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर देण्यात यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी.)

(राष्ट्रगीत संपल्यानंतर नारे देण्यात यावे...)

भारत माता की जय...!!

भारत माता की जय...!!

भारत माता की जय...!!

विजयी विश्व तिरंगा प्यारा... झेंडा गीताचे समूहगायन घेण्यात यावे.

सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्याना विनंती करतो / करते... धन्यवाद !!

मान्यवर परिचय :

व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा.

अध्यक्ष : श्री / सौ. ................

प्रमुख पाहुणे : श्री. / सौ. ................

मान्यवर स्वागत :

(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे.)

प्रास्ताविक :

मान्यवरांचा आशिर्वाद घेवून

साथ द्यावी सर्वांनी मिळून

आजच्या कार्यक्रमाचा उद्देश

जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील  श्री. / सौ. ........ हे / या करतील.

१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली. सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, "मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक' अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. लालकिल्ल्यावर 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले.

मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला ? दीडशे वर्षे राज्य कसे केले ? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले.

आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू, उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी ' करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या ' आझाद हिंद सेने 'नेही अभूतपूर्व कामगिरी केली.

विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासा लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या. रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया ! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत.

मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. 

देशहिताचे विचार अंगी बाळगण्याची व देशभक्ती, राष्ट्रहित प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या हृदयी जोपासण्याची. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो / देते.. धन्यवाद !!

(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत, हे नियोजन आपल्या स्तरावर अगोदरच करून ठेवावे.)

(आपल्या नियोजनानुसार सांस्कृतिक कार्यक्रम / देशभक्ती गीत गायन घेण्यात यावे.)

अध्यक्षीय भाषण : 

तेज तुमचे आहे

सुर्य-चंद्राहूनही जास्त

तुमच्या शब्दातच आहे

जीवणाचे संपूर्ण शास्त्र

ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून

कळस गाढू प्रगतीचा

त्यासाठी मान आहे

आजच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाचा

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. ...... यांनी त्यांच्या अनुभावाच्या व ज्ञानाच्या कुंभातील काही मौलिक विचार मांडावेत. जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत... धन्यवाद !!

आभार :

ज्ञानकुंभ रिता करुनी

राष्ट्रहिताचे ज्ञान दिले

बोधामृत पाजून देशभक्तीचे

आम्हा उपकृत केले

कार्यक्रम झाला बहारदार

भाषणेही झाली जोरदार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

आतिथींच्या येण्याने

कार्यक्रमाला शोभा आली 

आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला

नवी दिशा मिळाली

आणि शेवटी आता...

आभारप्रदर्षनाची वेळ आली.

आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत

आजच्या कार्यक्रमाचे शिल्पकार

मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

सर्व मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची निश्चितच प्रगती साधली जाईल.

सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल मी ........ विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे पुनश्च एकवार मनपूर्वक आभार मानतो/मानते.

जहाँ प्रेम की भाषा हैं सर्वोपरि

जहाँ धर्म की आशा हैं सर्वोपरि

ऐसा हैं मेरा देश हिन्दुस्तान

जहाँ देश भक्ति की भावना हैं सर्वोपरि

आणि शेवटी निरोप घेता घेता एवढेच म्हणेन कि...

हा देश माझा याचे भान,

जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या !

अध्यक्षांच्या परवानगीने स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो / करते.

!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!

(कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)

शब्दांकन : गिरीष दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

----------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

----------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

----------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

----------------------------

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

أحدث أقدم