मुलगा होणार वा मुलगी हे कशावरून ठरते ?

एखादी स्त्री बाळंत होईपर्यंत नातेवाईकांच्या विशेषत: तिच्या आईच्या जीवात जीव नसतो. केव्हा एकदा मुलगा झाल्याची बातमी कानावर येते असे त्यांना झालेले असते. आधीच्या बाळंतपणात मुली झालेल्या असतील तर मग विचारायलाच नको. आपला समाज पुरूषप्रधान असल्यामुळे व मुलगा हा कुलदीपकम्हातारपणाचा आधार वगैरे कल्पना रुजलेल्या असल्यामुळे मुलगा झाला नाही तर दुसरे लग्न करणेबायकोला टाकून देणे अशा गोष्टी घडतात. मुलगा होणार वा मुलगी हे कसे ठरतेयामागचे शास्त्रीय कारण बघितलेतर मुलगा न होण्यात स्त्रीची काहीच चूक नसतेअसे आपल्या लक्षात येईल.

मूल होण्यासाठी पुरुषांचा शुक्राणू व स्त्रीबीज यांचे मिलन होणे आवश्यक असते. यालाच गर्भधारणा असे म्हणता येईल. लिंग ठरवण्यासाठी माणसाच्या शुक्राणूत व स्त्रीबीजात लिंगसूत्रे (Sex Chromosome) असतात पुरुषांत व ही लिंगसूत्रेतर स्त्रीमध्ये व अशी लिंगसूत्रे असतात. पुरुषांच्या काही शुक्राणूत तर काही शुक्राणूत हे लिंगसूत्र असते. सर्व स्त्रीबीजात मात्र हेच लिंगसूत्र असते. पुरुषांचे व स्त्रीचे लिंगसूत्र एकत्र आलेतर मुलगी होते. पुरुषाचे ५ व स्त्रीचे ४८ ही गुणसूत्रे एकत्र असल्यास आल्यास मुलगा होतो. अर्थात स्त्रीबीजात लिंगसूत्रच असते व पुरुषातून लिंगसूत्र मिळाल्याखेरीज मुलगा होऊ शकत नाही. या दृष्टीने बघायला गेल्यास मुलगा न होण्यामागे पुरुष जबाबदार असतो. स्त्रीला दोषी मानणे हे अन्यायकारक आहे. हे शास्त्रीय सत्य सर्व समाजाला माहीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांवर अकारण होणारे अत्याचार कमी होण्यास मदत होईल.

डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेजया पुस्तकातून,

मनोविकास प्रकाशन

أحدث أقدم