११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन | जागतिक लोकसंख्या दिन माहिती | World Population Day

जागतिक लोकसंख्या म्हणजेच जगाची एकूण मानवी लोकसंख्या होय. भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे. मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

  जागतिक  लोकसंख्येचे  वितरण  

11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन' म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी 'ओव्हरफ्लो' होऊन वाहत आहेत. विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे. हय़ा शतकात अनेक विशेष महत्त्वाच्या अनेक देशांच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना, घडामोडी घडल्या. दोन जागतिक महायुध्दे, वसाहातिक देशांनी मिळविलेले स्वातंत्र्य, चंद्रावर मानवाचे पाऊल, अणुस्फोटामुळे समाप्त झालेले दुसरे महायुध्द, व्हिएतनामने अमेरिकेपुढे पत्करलेली शरणागती, अनेक मौलिक शोध, संशोधन, रशियाचा उदयास्त. हय़ा काही प्रतिनिधीक घडामोडी, घटना होत. हय़ाशिवाय 20 व्या शतकात झालेली विश्वलोकसंख्येतील प्रचंड वाढ ही विशेष क्रांतिकारी घटना होय. 1927 साली विश्वलोकसंख्या होती 2 अब्ज, अवघ्या 30 वर्षात ती झाली 1959 मध्ये 3 अब्ज आणि 39 वर्षात विश्वलोकसंख्या दुप्पट म्हणजे 6 अब्ज. 11जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाचे अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस 'विश्वलोकसंख्या दिन' म्हणून जगभर पाळला जात आहे. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हय़ा पाच खंडामधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आणि अगदी कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे ऑस्ट्रेलियाची. जगाच्या एकूण लोकसंख्येत 60 टक्के आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या दोन क्रमांकाचे देश हय़ा खंडामध्ये आशियात आहेत. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या 25 टक्के आहे म्हणजे 30 कोटी. 21 व्या शतकात आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल. आफ्रिका खंडाची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक असेल. 2011 मध्ये आफ्रिकाची लोकसंख्या होती 1 अब्ज. ती लोकसंख्या 2100 मध्ये 3.6 अब्ज होईल. 2011 मध्ये इतर खंडाची मिळून लोकसंख्या होती 1.7 अब्ज. 2060 मध्ये ही लोकसंख्या 2 अब्ज असेल. युरोपची लोकसंख्या 2025 मध्ये 0.74 अब्ज असेल आणि त्यानंतर युरोपच्या लोकसंख्ये आणखी घट होईल. आफ्रिका खंडाच्या लोकसंख्येत वाढ दर वर्षी 2.3 टक्के होत आहे तर आशिया खंडाची वाढ होत आहे 1 टक्के. जगाची लोकसंख्या होती अशी - 1804-1 अब्ज, 1927 - 2 अब्ज, 1959 - 3 अब्ज, 1974 - 4 अब्ज, 1987- 5 अब्ज, 1999 - 6 अब्ज, 2011 7 अब्ज. संयुक्त राष्ट्रसंघाने 1999 - 6 अब्ज एक मोठा मैलाचा दगड म्हणून मानला. भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011 च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली आहे. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक झाली आहे. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी भर पडत आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा हय़ा आठ राज्यातील लोकसंख्या वाढ विशेष आहे. हय़ा आठ राज्यांची एकूण लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येत जवळजवळ 48 टक्के आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या प्रगतीच्या दृष्टीने 150 जिल्हे मागासलेले आहेत. हे सारे जिल्हे हय़ा आठ राज्यातील आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिणेतील चार राज्ये - आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमात चांगली कामगिरी बजावली आहे. केरळ राज्याने साक्षरता प्रसार, शिक्षण प्रमाणात वाढ, पायाभूत क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा करून आरोग्य सेवांचा उत्तम प्रसार करून विकासाच्या दृष्टीने एक मॉडेल निर्माण केले आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या भरीव प्रगतीस वरील बाबीमुळे साहाय्य झाले आहे, उपकारक ठरल्या आहेत. काँग्रेसप्रणित आणि डावी लोकशाही आघाडी राज्यांनी हा कार्यक्रम नेटाने, निर्धाराने पुढे नेला आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1961 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती 3.95 कोटी. 1961-1971 दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 27.45 टक्के वाढ झाली. नंतरच्या दशकात 1971-1981 वाढ झाली 24.54. 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीहून अधिक होती. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत राजधानी मुंबईचा वाटा फार मोठा आहे. 2001 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1.19 कोटी होती आणि 2011 मध्ये ती लोकसंख्या 1.50 कोटीहून अधिक आहे. मुंबईच्या लोकसंख्या वाढीत राज्यातील इतर जिल्हय़ामधून व देशाच्या इतर राज्यांमधून नोकरी, दैनंदिन रोजीरोटी, शैक्षणिक संधी आदी कारणांसाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरण झाले आहे. 1991-2001 मध्ये दक्षिणेतील चारही राज्यातून मुंबईत येणार्यांचे प्रमाण घटले आहे. प्रमाण वाढले आहे ते उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून येणार्यांचे. 1991-2001 दशकात मुंबईची नैसर्गिक वाढ होती 61 टक्के. स्थलांतरणामुळे 43.7 टक्के. "लोकसंख्या ही मुंबईची नेहमीच दंडदेवता ठरली आहे. पण मुंबई म्हणजे काही केवळ आकडे नव्हे. संख्याशास्त्राचा संच नव्हे पण मुंबई म्हणजे शहरातील लोक, | जनसामान्य.असे म्हटले जाते. जन्मप्रमाण, मृत्यूप्रमाण, स्थलांतरण वाढीनुसार लोकसंख्या, स्त्री-पुरुष संख्येतील चढउतार होत असतात. मुंबई ही भारताची व्यापारी राजधानी व औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठे केंद्र आहे. हे सर्वमान्य आहे. बाहेरच्या राज्यातून पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद हय़ा चार शहरातही मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत आहे. आधुनिकीकरण, औद्योगिकरण, शहरीकरण हय़ा तीन प्रमुख कारणांमुळे स्थलांतरण होत आहे. त्यामुळे शहरामध्ये जसा वाढत्या लोकसंख्येची समस्या निर्माण झाली आहे. त्याबरोबरच शहरामध्ये झोपडपट्टय़ामध्येही प्रचंड वाढ होत आहे, कारण शहरांमध्ये नोकरी, रोजगारी मिळेल पण बर्यांपैकी निवारा, आसरा, घर मिळणे ही विशेष कठीण बाब ठरली आहे. त्यामुळे झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेतला जात आहे. विश्वलोकसंख्येत पहिले 10 मोठय़ा लोकसंख्येचे देश आहेत चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, रशिया आणि जपान आणि देशातील राज्ये आहेत. टक्केवारीत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू (तिन्ही राज्यातील टक्केवारी प्रत्येकी 6 टक्के) गुजरात, ओरिसा, झारखंड व केरळ (चारही राज्ये प्रत्येकी 3 टक्के) छत्तीसगड, पंजाब, हरयाणा (प्रत्येकी लोकसंख्या 2 टक्के) उत्तराखंड व दिल्ली (प्रत्येकी 1 टक्के, इतर राज्यांची 2 टक्के). देशातील मोठय़ा लोकसंख्येच्या राज्यात लोकसंख्यावाढीत घट होणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ व्हायला हवी हाच यंदाच्या विश्वलोकसंख्या दिनाचा संदेश आहे.

  लोकसंख्या  शिक्षण 

लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे. इ. सन १६५० पासून जागतिक लोकसंख्येचा अभ्यास सुरु झाला. त्या काळातील म्हणजे १६५० ते १९३५ पर्यंत लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय मंद होता. कारण त्या काळात सर्व जगात जन्माचे मृत्यूचे प्रमाण हे सारखेच होते. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झालेली नव्हती. बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु १९२५ ते १९६० नंतर मात्र लोकसंख्येत वाढ होणे सुरु झाले. कारण या काळात आरोग्याची स्थिती सुधारली, विविध लसी आणि औषधांचा शोध लागला. माता व बालक जगविण्याविषयी बहुसंख्य रोगावर लस उपलब्ध झाली. तसेच वैदयकशास्त्रात व चिकित्सा शास्त्रात विशेष क्रांती झाली आणि जवळजवळ सर्वच असाध्य रोगांवर प्रतिबंधक औषधे उपलब्ध झाली. त्यामुळे मृत्युदर घटला. परंतु जन्मदर तोच राहिला.

२१ व्या शतकाच्या १०० वर्षात २०० कोटीमध्ये ७२० कोटींची भर पडून ती १४२० कोटी होईल व ही लोकसंख्या स्थिर होण्यासाठी व वाढीचा दर कमी करण्यासाठी किमान १०० वर्षे लागतील असा अंदाज आहे. अशा लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी माणसावर होणारे परिणाम सांगितले पाहिजेत.

भारतातील लोकसंख्या वाढत गेली तर सर्वांनाच असंख्य अडचणीचा सामना करावा लागेल. ही लोकसंख्या कशी वाढते ? त्यामुळे कुठले प्रश्न, अडचणी निर्माण होतात ? त्यावरील उपाय काय हे सगळे समजावून घेणे म्हणजेच लोकसंख्या शिक्षण.

  वाढत्या  लोकसंख्येचे  आव्हान  

वाढत्या लोकसंख्येचे आव्हान लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातील दुस-या क्रमांकाचा देश आहे. जर कुटुंब नियोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नाही तर २०२५ साली भारत लोकसंख्येच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा देश होण्याची भीती आहे. पण शासन सक्तीचे कुटुंब नियोजन करण्याचा धोका पत्करणार नसल्याने ही वाढ अपरिहार्य ठरणार आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वीच भारताने जागतिक लोकसंख्येचा सात अब्जचा टप्पा पूर्ण केला आहे. लोकसंख्या वाढ ही न संपणारी प्रक्रिया आहे. चीनची संख्या प्रमाणाबाहेर गेल्याने त्या देशाने लोकसंख्या वाढीवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. पण आपल्या भारतात तेही नाहीत त्यामुळे २०२५ साली भारताची लोकसंख्या १७० कोटी होईल आणि आज प्रथम क्रमांकावर असलेल्या चीनला मागे टाकून भारत लोकसंख्येच्यादृष्टीने जगात प्रथम क्रमांकावर येईल.

२०१० सालापर्यंत भारताने आपली लोकसंख्या स्थिर ठेवण्याचे ठरविले होते. पण इतर अनेक उद्दिष्ट्याप्रमाणेच लोकसंख्या स्थिर ठेवण्याचे उद्दिष्टही चाळीस वर्षांनी पुढे गेले आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आणिबाणीच्या काळात संजय गांधी नसबंदीचा प्रयोग राबविण्यात आला. पण ब-याच राज्यात त्याचा अतिरेक झाला आणि इंदिरा गांधी यांना त्यामुळे सत्ता सोडावी लागली. पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या राज्यकत्र्यांनी नसबंदीची एवढी भीती घेतली की, सत्तारुढ अशा कुठल्याही पक्षाने नसबंदीचे साधे नाव घेतले नाही. मग अंमलबजावणी होणे दूरच. चीनने मात्र एका अपत्यानंतर नसबंदी सक्तीची केली आहे. आज आपला भारत इतर कुठल्या बाबतीत आघाडीवर नसला तरी लोकसंख्येच्या वाढीबाबत आघाडीवर आहे. तसे पाहिले तर लोकसंख्येचा राक्षस जगभर थैमान घालत आहे.

कृषी क्षेत्राचा विकास आणि वैद्यक शास्त्रातील शोध यामुळे माणसांचे आयुर्मान वाढत आहे. त्यामुळे जन्माचे प्रमाण मोठे पण मृत्यूचे प्रमाण कमी यामुळे असमतोल निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी जगभरातील नागरिकांना हवामानातील बदल, वाढते प्रदूषण, आर्थिक पेचप्रसंग या समस्येवर मात करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे लोकसंख्या विषयीचे कार्यकारी संचालक बाबा लुंडे ओसोनिमेदीन यांच्या मते भविष्यात आपण करणार असलेल्या कृतीवर बरेच काही अवलंबून आहे. विषमता व पर्यावरण -हास करणारे आर्थिक पेचप्रसंगी वाढवायचे की थांबवायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज पुरेशा अन्नाअभावी शंभर कोटी लोक उपासी राहतात. अनेक सुखसमृद्धी आल्या आहेत पण बहुतांशी लोक गरीबीत खितपत पडत आहेत. नागरिकांना अन्न, ऊर्जा, शिक्षण, स्वातंत्र्य व संरक्षण मिळणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विषयक अंदाजानुसार येत्या चौदा वर्षात जगाच्या लोकसंख्येपैकी दोन तृतियांश लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. जगातील वनक्षेत्रापैकी अध्यापेक्षा अधिक वनक्षेत्रावर मानवांनी आक्रमण केले आहे. सुरक्षित भवितव्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जगात गेल्या साठ वर्षात साडे चार अब्ज लोकांची भर पडली आहे. २०४० पर्यंत चार पैकी एक जण साठ वर्षे वयोमर्यादिच्या पुढचा असेल. म्हणजे साठ वर्षावरील लोकांची संख्या दुप्पट होणार आहे. याचा अर्थ जगातील जे देश आपली लोकसंख्या मर्यादित ठेवतील त्यांचाच पुढील काळात निभाव लागणार आहे. भारताला पुढील काळात नियोजनपूर्वक योजना आखाव्या लागतील आणि लोकसंख्या वाढ मर्यादित ठेवण्यावर भर द्यावा लागेल तरच देशाला भवितव्य असेल असे पाश्चात्य विचारवंतांचे मत आहे.

जागतिक लोकसंख्या दिन पुढील उपक्रम व कृतीने आपल्या विद्यालयांमध्ये साजरा करता येईल :

१) लोकसंख्या नियंत्रणासाठी घोशवाक्यांची स्पर्धा आयोजित कार लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम विचर

२) लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम या विषयावर तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करणे.

३) लोकसंख्या नियंत्रण एक पर्यावरणीय गरज या विषयावर चर्चा सत्र, निबंध स्पर्धा भरविणे.

४) कुटुंब छोटे- सुख मोठे या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. TE

५) लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करणे.

६) भित्तीपत्रके, भित्तीचित्रे सार्वजनिक ठिकाणी लावणे.

७) लोकसंख्या वाढीमुळे पायाभूत सेवा सुविधा वर पडणारा ताण याबाबतची माहिती संकलन करणे. 

  लोकसंख्यावाढीचे  परिणाम  

झपाटय़ाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी गरज आहेत ती शासनस्तरावर सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल.

जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याने करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण असे या दिनाचे घोषवाक्य ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी सांगितले. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.

आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी ऐशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987 साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन / इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.

लोकसंख्यावाढ चिंताजनक :

देशात 'अच्छे दिन' आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 121 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारत मागे टाकणच्यादृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर :

जगाची लोकसंख्या 7,025,071,966 अब्ज एवढी झाली असून भारताची लोकसंख्या 121 कोटी एवढी नोंदविण्यात आली आहे. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के इतकी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख इतकी झाली असून लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून चौफेर पसरलेल्या ठाणे जिल्हय़ाची नोंद करण्यात आली आहे. 

  लोकसंख्या दिन फेरी  घोषवाक्ये  

१) जर असेल कुटुंब लहान, तर मिळेल सुख महान.

२) लोकसंख्या शिक्षण म्हणजे राष्ट्रोन्नतीचे लक्षण.

३) विचार करा एकाचा मार्ग कुटुंब कल्याणाचा.

४) प्रश्न वाढता लोकसंख्येचा उपाय कुटुंब नियोजनाचा. ,

५) छोटे कुटुंब एकच मुल, तेच होईल सुगंधी फुल.

६) आजचे सर्वांचे प्रयोजन, चला करूया कुटुंब नियोजन.

७) कुटुंब नियोजनात कसूर, लोकसंख्येचा प्रश्न भेसूर.

८) कुटुंबाचा लहान आकार, सुखी जीवनाचे स्वप्न साकार.

९) सुखी संसाराचे सूत्र, कन्येला मना पुत्र.

१०) कुटुंब असेल लहान, होईल मेरा भारत महान.

११) खूपच वाढता महागाई, एकच मुल पुरे बाई.

१२) नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगा हवा.

१३) बालिका अथवा बालक, संपत्तीला एकच मालक.

१४) मुलगा असो वा मुलगी दोघानाही द्या समान संधी.

१५) त्रिकोणातील तीन कोन, संतती एकच पालक दोन.

१६) एक कुटुंब एकच वारस, एकच अपत्य ठरेल सरस.

१७) हिंदू हो या मुसलमान, एक परिवार एक संतान.

१८) आमचा लहान परिवार, त्यात आनंद अपार.

१९) छोट्या कुटुंबाची आहे शान, सदैव उंचावेल जीवनमान

२०) छोटे कुटुंब सुखी कुटुंब, मोठे कुटुंब दुखी कुटुंब

२१) कुटुंब पाहीजे इतके छोटे की लोकसंख्येचा प्रश्न सुटे.

२२) लोकसंख्या ठेवा नियंत्रीत गरजा भागतील सुरळीत.

२३) करूया लोकसंख्येचे नियंत्रण, अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण.

२४) करा कुटुंब नियोजनाचा स्वीकार, अन्यथा होईल हाहाकार

२५) वैवाहिक सुखात नसे बाधा, पुरुष नसबंदीने कुटुंबकल्याण साधा.

२६) धरू नका मुलाची अशा डोळ्यासमोर ठेवा पी. टी. उषा.

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

--------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

--------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

أحدث أقدم