२५ डिसेंबर राष्ट्रीय मतदार दिवस | 25th December National Voter Day

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य : कार्यालयाचे दिनांक २1 डिसेंबर 2021 चे पत्र...

दि. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्याबाबत...

दि. २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतमदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते.

या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा कार्यालयांनी आणि मतदार नोंदणी कार्यालयांनी २५ जानेवारी रोजी कार्यक्रम आयोजित करावेत. निवडणूक साक्षरता मंडळे सक्षम करण्याच्या दृष्टीने यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आखलेला आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे.

परिशिष्ट ६ नुसार : सदर दिवशी विद्यार्थ्यांसोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा.

शाळास्तरावर  इ. नववी व दहावी आणि कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी विविध स्पर्धांच्या विषयांची सर्वसमावेशक यादी :

1. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी

2. वर्गप्रमुख पदाची निवडणूक मी अशी लढवणार...

3. माझा नगरसेवक / सरपंच असा हवा...

4. मी नगरसेवक /सरपंच झालो / झाले तर...

5. मी आमदार झालो / झाले तर....

6. माझा आमदार असा हवा...

7. मी खासदार झालो / झाले तर...

8. माझा खासदार असा हवा

9. एका बोटावरच्या शाईची किंमत?

10. मी मताधिकार बजावणार कारण...

11. अठराव्या वर्षाची जबाबदारी

वरिष्ठ महाविद्यालयांसाठी विविध स्पर्धा आणि विषयांची यादी :

अ. निबंध :

1. मी मताधिकार बाजावणार कारण...

2. मताधिकाराची सक्ती करावी का?

3. सोहळा लोकशाहीचा जागर मताधिकाराचा

4. हक्क वंचितांचे मार्ग मताधिकाराचा

५. तीनव्या युगाचा / युगाची मतदार

६. शहरी मतदारांची अनास्था - कारणे आणि उपाय

7. मी माझं मत विकणार नाही!

8. एका बोटावरच्या शाईची किंमत?

आ. मीम :

१. मताधिकार हा माझा कायदेशीर अधिकार

२. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचे महत्त्व

३. अपंगांच्या मताधिकाराचे महत्त्व आणि आवाहन

४. तृतीय पंथीयांच्या मताधिकाराचे महत्त्व आणि आवाहन

ई. वक्तृत्व :

1. आपल्या देशात लोकशाही रुजली आहे का? 

2. . . . .  म्हणून मी मताधिकार बजावतो/बजावते!

3. लोकशाही आणि तरुण मतदार

4. व्यवस्था बदलाचा राजमार्ग : मताधिकार

5. मताधिकाराची सक्ती करावी का?

6. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी - मतदार नोंदणी

उ. चित्रकला

1. 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

2. स्त्रियांना मतदार नोंदणीचे आवाहन

3. अपंगांच्या मताधिकाराचे महत्त्व आणि आवाहन

4. तृतीय पंथीयांच्या मताधिकाराचे महत्त्व आणि आवाहन

ऊ. घोषवाक्य :

1. सर्वोत्कृष्ट शासनपद्धती - लोकशाही

2. 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणीच आवाहन

3. मताधिकाराचे महत्त्व

ए. गाणे :

१. लोकशाही शासनपद्धतीचे फायदे

२. 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी आवाहन

३. सक्षम लोकशाहीसाठी मताधिकाराचे महत्त्व

परिशिष्ट ७ नुसार : मतदारांसाठी "मतदार प्रतिज्ञा" घेण्यात यावी.

أحدث أقدم