शीतपेय प्यायल्याने काय फायदा होतो ?

उन्हाळ्यात गारेगार थम्सअप किंवा पेप्सी प्यायला कोणाला बरे आवडणार नाहीतुम्हीही बर्याचदा ते प्यायले असेलपण या शीतपेयांचा आरोग्यासाठी काही उपयोग होतो काअसा प्रश्न विचारल्यास उत्तर नाही असेच येईल.

वर उल्लेखलेल्या शीतपेयांमध्ये पाणीत्यात दाबाखाली विरघळवलेला कार्बन डाय ऑक्साइडखायचा सोडासायट्रीक वा टार्टारीक आम्ल हे पदार्थ असतात. सोबत रंगद्रव्ये व वास येणारी द्रव्ये असतात. अल्प प्रमाणात साखरही असते. थोडक्यात म्हणजे पैसे खर्च करून आरोग्याच्या दृष्टीने केवळ २५ ते ३० कॅलरी एवढी वा त्याहूनही कमी ऊर्जा मिळते. पोटातील आम्लाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे भूक मंदावते. म्हणजे पैसेही जातात व आरोग्याच्या दृष्टीने फायद्यापेक्षा तोटेच जास्त होतात. त्यामुळे फॅशन म्हणून असल्या शीतपेयांमध्ये पैसे वाया घालवण्यापेक्षा लिंबू सरबतसंत्र्याचा रस इत्यादी नैसर्गिकपणे मिळणाया स्वस्त आणि पोषण मूल्ये असणार्या पेयांचाच वापर करावा. त्यांच्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाहीतपैशाचा अपव्ययही टळेल व शिवाय उन्हाळ्यात थंडगार वाटेल ते वेगळेचबर्फ मात्र शुद्ध पाण्याचाच बनवलेला आहेह्याची खात्री करूनच वापरानाहीतर दूषित पाण्यामुळे होणाऱ्या काविळीसारख्या रोगाला बळी पडाल.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत  डॉजगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून... 

أحدث أقدم