रसायनशास्त्रात तुम्ही 'हसवणारा वायूवा लाफींग गॅसबद्दल वाचले असेल. रडवणारा वायू तुम्ही या वा इतर पुस्तकात वाचले असेल. या हसवणाऱ्या बायुची माहिती घेऊ. हा वायू म्हणजे नायट्रस ऑक्साईड होय. नायट्रस ऑक्साईड हा एक रंगहीन वायू असून त्याला विशिष्ट असा गंध व गोडसर चव असते. दंतशल्यचिकित्सक भूल देण्यासाठी बऱ्याचदा या वायुचा वापर करतात. लहान शस्त्रक्रिया करण्यासाठी (कमी वेळ लागणाऱ्या शस्त्रक्रिया) भूल देताना देखील या वायुचा वापर करतात. २०% ऑक्सिजन व हा वायू असे मिश्रण वापरतात. श्वासावाटे शरीरात हा वायू गेल्यानंतर सुरुवातीला सौम्य प्रमाणात बधिरता येते. व्यक्ती या काळात उत्तेजित झालेली असते व हसायला लागते. म्हणूनच या बायुला लाफींग गॅस असे नाव पडलेले आहे. वायुचा डोस याहून जास्त वाढवल्यास पूर्ण बधिरीकरण होते. खूप जास्त प्रमाणात हा वायू शरीरात गेल्यास श्वसन थांबून मृत्यू येतो. 

जास्त प्रमाणात वायू शरीरात गेल्यास विषबाधा होते. या विषबाधेवर ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड श्वासावाटे देणेकृत्रिम श्वसन यंत्राचा वापरउत्तेजक औषधे आदींचा वापर करतात. शस्त्रक्रियागारात ऑक्सिजन समजून क्वचित नायट्रस ऑक्साईडचा सिलींडर वापरला जाऊ शकतो व दुर्घटना घडू शकते. कधीकधी भूल खूप जास्त काळ द्यावी लागलीतर मेंदूला इजा पोहोचते. अर्थात या दोन्ही गोष्टींमध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असतो.

डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन

أحدث أقدم