परसबाग म्हणजे परसातील वाग! आपल्याला बाग म्हटली म्हणजे गुलाबजाईजुईकॅक्टस अशी शोभेचीसुवासिक फुलांची झाडे आठवतात. परसबाग ही मात्र अशी वाग नव्हें.. बऱ्याच ठिकाणी बाथरूममधील पाणी गटाराद्वारे वाहून नेण्याची सोय नसते. खेड्यांमध्ये तर जवळपास

ही बाब सर्व ठिकाणीच आढळून येते. त्यामुळे घराच्या मागील बाजूस घाण पाणी साठलेले दिसते. अशा साठलेल्या घाण पाण्याचे अनेक दुष्परिणाम होतात. दिसायला वाईट दिसणेदुर्गंधी येणे याखेरीज़ तेथे डासांची पैदास होते. साहजिकच हिवतापहत्तीरोग यांचा प्रादुर्भाव होतो. हे सर्व टाळण्यासाठी सांडपाण्याची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असते. भूमिगत गटारे नसलेल्या ठिकाणी पाणी रस्त्यावर न सोडता शोषखड्डे तयार करावेत किंवा दुसरा पर्याय म्हणजे परसबाग तयार करावी. अळूच्या पानांसारख्या भाज्या परसबागेत चांगल्या वाढू शकतात. इतरही भाजीपाला लावता येईल. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ती म्हणजेसांडपाण्यावर वाढवलेल्या कोणत्याही भाज्या कच्च्या खाऊ नयेत. त्या योग्यं प्रकारे धुवून व शिजवूनच खाव्यात. अन्यथा हगवणआमांशजंत असे रोग पसरण्याची शक्यता असते. पाणी पुरेसे असेल तर एखादे पपईचेशेवग्याचे झाड नक्कीच वाढवता येईल. यामुळे सांडपाण्याचे दुष्परिणाम तर टळतीलचपण पपईशेवग्याच्या शेंगाअळू असे पोषक पदार्थही खायला मिळतील.

डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन

أحدث أقدم