झपाटय़ाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी गरज आहेत ती शासनस्तरावर सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल.
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याने 'करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण' असे या द घोषवाक्य ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी सांगितले. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.
आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी ऐशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987 साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन / इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.
लोकसंख्यावाढ चिंताजनक :
देशात 'अच्छे दिन' आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 121 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे.
चीनलादेखील भारत मागे टाकणच्यादृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.
महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर :
जगाची लोकसंख्या 7,025,071,966 अब्ज एवढी झाली असून भारताची लोकसंख्या 121 कोटी एवढी नोंदविण्यात आली आहे. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के इतकी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख इतकी झाली असून लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून चौफेर पसरलेल्या ठाणे जिल्हय़ाची नोंद करण्यात आली आहे.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻