जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रसंघात १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते. दशकअखेरीस तीन डिसेंबरची निवड झाली होती व १९९२ मध्ये पहिला 'अपंग दिन' साजरा झाला होता.
जागतिक अपंग दिन हा युनायटेड नेशन्स यांनी एकत्रित कार्य करून अपंगासाठी जाहीर केला आहे. हा दिवस अपंगासाठी व त्यांच्या कार्य क्षमतेसाठी व जनजागृतीसाठी साजरा केला जातो.
३ डिसेंबर हाच दिवस जागतिक अपंग दिन का ठरवला गेला ?
अपंग दिन - इतिहास : हा दिवस १९९२ मध्ये जाहीर केला. ह्या दिवशी जनरल असेंब्लीत अपंगत्वाबाबत जागृकता त्यांना राजकीय, सामाजिक कार्यक्रमास सामील करून घेण्याची भावना वाढवण्यासाठी कार्य केले जाते. जवळजवळ अर्धा बिलीयन लोक, शारीरीक, मानसिक यापैकी कोणत्याही प्रकारामुळे अपंग आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात राहात असले तरी त्यांच्या आयुष्यावर शारीरीक व सामाजिक प्रकारची अनेक बंधने येतात.
अपंगाना अनेक क्षेत्रात मान्यता मिळवण्यास गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या क्षेत्रात घडलेली चांगली |घटना ज्या मुळे या क्षेत्राला क्षूप चांगले वळण मिळाले ती म्हणजे, १९८१ मध्ये जनरल असेंब्ली ने जाहीर केलेले अपंगत्व वर्षे. तसेच जागतिक अपंगत्व दशक (१९८३ ते १९९२) हे अपंगाचा संपूर्ण सहभाग आहे आणि बरोबरीने या भावना वाढवण्यासाठी ह्या दशकाचा वापर केला गेला. अपंगाच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी १९९२ मध्ये जनरल असेंब्ली ने कार्यक्रम सादर केला होता.
जागतिक कार्यक्रमाला आधारून सॅन्डर्ड रूलस् ऑन इकवॅलायलेशन ऑफ अपॉर्च्यूनिटीस् फॉर परसन्स विथ डीसऍबिलीटीज हे १९९३ मध्ये तयार केले गेले. ते सर्व नियम गव्हर्मेंटला बंधनकारक नव्हते. अपंगाच्या नैतिक भावना या नियमांची बळकट झाल्या. युनायटेड नेशन्स चे कार्य हे मिळणाऱ्या संधी सर्वत्र उपलब्ध होत आहे यावर केंद्रित होते.
आज जगातली दहा टक्के लोकसंख्या, म्हणजेच सुमारे ६५ कोटी लोक या ना त्या रूपाने अपंग आहेत. जागतिक आरोग्य संघटनादेखील अपंग बांधवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्नशील असते. त्यासाठी विभागीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जातात.
१) शाळा, कॉलेजेस, सरकारी खाजगी-निमसरकारी संस्थांमार्फत आयोजित उपक्रमात सहभागी होणे.
२) विविध प्रचार मोहिमा आयोजित करून अपंगाच्या प्रश्नांना वाचा फोडणे. त्यांना सहकार्याचे अभिवचन देणे.
३) अपंग बांधवांच्या ठायी असलेल्या छुप्या कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी उत्सव-मेळावे भरविणे आणि त्यांची जगण्याची उभारी वाढविणे.
४) अपंगांच्या उद्धारासाठी जागतिक स्तरांवरची नियमावली तर त्यासाठी काटेकोरपणे दक्षत् कटाक्षाने पाळली जात नसेल तर त्यासाठी काटेकोरपणे दक्षता घेऊन ते मार्गी लावणे.