वाक्प्रचार म्हणजे काय ?

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया :

(१) झाडावर कावळे कोकलत होते.

(२) दुपारी रघूच्या पोटात कावळे कोकलू लागले.

पहिल्या वाक्यातील कावळे कोकलणे याचा सरळ अर्थ 'कावळे ओरडत होते' असा आहे. दुसऱ्या वाक्यातील पोटात कावळे कोकलणे याचा अर्थ 'भूक लागणे' असा आहे. जेव्हा एखादया शब्दसमूहाचा सरळ शाब्दिक अर्थ न घेता, त्यातून वेगळा प्रतीत होतो, तेव्हा त्यास वाक्प्रचार म्हणतात. म्हणून 'पोटात कावळे कोकलणे' हा वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

१) दिलासा मिळणे - धीर मिळणे.

२) कणखर बनणे - काटक बनणे.

३) ओढाताण होणे - कष्टदायक धावपळ होणे.

४) जिवात जीव नसणे - खूप घाबरणे.

५) नात्यातील वीण गहिरी असणे - नाते घट्ट असणे. पना

६) गराडा पडणे - (माणसांच्या घोळक्याचा) घेराव पडणे.

७) वणवण सहन करणे - त्रासदायक भटकंती सहन करणे.

८) समजूत काढणे गैरसमज दूर करणे.

९) नाव उंच करणे - कीर्ती संपादन करणे, मानाचे स्थान मिळवणे.

१०) दबदबा निर्माण करणे - दरारा निर्माण करणे.

११) हिऱ्याला पैलू पाडणे - तरबेज करणे.

१२) सांभाळ करणे - पालनपोषण करणे.

१३) राब राब राबणे - खूप कष्ट करणे.

१४) कमीपणा वाटणे - अपमान वाटणे.

१६) खंत वाटणे खेद वाटणे, वाईट वाटणे.

१५) परिस्थितीशी झगडून - वाईट स्थितीचा कल्पना मुकाबला करणे.

१७) कसूर न करणे - चूक न करणे, दुर्लक्ष न करणे.

१८) खंड पडणे मध्येच थांबणे.

१९) धाबे दणाणणे - खूप भीती वाटणे.

२०) ओढाताण होणे - त्रासदायक धावपळ होणे.

२१) अंग घामाने थबथबणे - घाबरल्यामुळे घामाघूम होणे. व्हाण

२२) तोडावाटे शब्द न फुटणे खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे.

२३) कालवा उडणे - कोलाहल माजणे, गडबडगोंधळ होणे.

२४) धाप लागणे खूप पळल्यामुळे दम लागणे.

२५) दूम नसणे ठावठिकाणा नसणे, पत्ता नसणे.

२६) विसर पडणे विस्मरण होणे. 

२७) पोटात खड्डा पडणे - खूप भीती वाटणे.

२८) जिवाचा धडा करणे- धीर एकवटणे.

२९) पाठबळ असणे- आधार असणे.

३०) घास मोडले - जेवण.

३१) पोटात घाबरा पडणे - खूप घाबरणे.

३२) पायाखालची जमीन हादरणे - भीतीने सुचेनासे होणे, भीतीने धसका घेणे.

३३) कंबर धरणे - कंबर दुखणे.

३४) वाट वाकडी करणे - वाट बदलून दुसरीकडे जाणे.

३५) रात्रंदिवस घाम गाळणे - दिवसरात्र खूप कष्ट करणे.

३६) चिटपाखरू नसणे- नीरव शांतता असणे.

३७) झेंडू फुटणे - भीतीमुळे तोंडाला फेस येणे.

वाक्प्रचारांचे अर्थ व वाक्यांत उपयोग

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दसमूह समजून घ्या :

(१) काल वर्गात आमच्या सरांनी पाठ्यपुस्तकातील एक धडा शिकवला.

(२) पोलिसांनी चोराला पकडून त्याला चांगलाच धडा शिकवला.

पहिल्या वाक्यातील 'धडा शिकवला' याचा अर्थ 'पाठ शिकवला', असा सरळ आहे. धडा शिकवला → दुसरे वाक्य लाक्षणिक ( वेगळा) अर्थ. दुसऱ्या वाक्यातील 'धडा शिकवला' याचा अर्थ 'अद्दल घडवली' असा लाक्षणिक अर्थ आहे.

धडा शिकवला पहिले वाक्य सरळ अर्थ म्हणून, जेव्हा एखाद्या शब्दसमूहाचा सरळ अर्थ बाजूला सारून वेगळा अर्थ त्यातून ध्वनित होतो त्यास वाक्प्रचार म्हणतात. म्हणून, दुसऱ्या वाक्यातील 'धडा शिकवला' हा वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचार धडा शिकवणे - अद्दल घडवणे, समज देणे.

पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.

१) रात्रंदिवस घाम गाळणे - वाक्य : शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो.

२) धाबे दणाणणे - वाक्य : अचानक समोर आलेला वाघ पाहून यात्रेकरूंचे धाबे दणाणले.

३) पोटात घाबरा पडणे - वाक्य : नदीला आलेला पूर बघून महादूच्या पोटात घाबरा पडला.

४) पायाखालची जमीन हादरणे - वाक्य : घरावर वीज कोसळली तेव्हा रामरावांच्या पायाखालची हादरली.

५) प्रसंगावधान राखणे - वाक्य : संकटकाळी प्रसंगावधान राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

६) काळजात धस्स होणे - वाक्य : अंगणात खेळणारा बाळ दिसेना, तेव्हा आईच्या काळजात धस्स झाले.

७) भेदरलेल्या नजरेने पाहणे - वाक्य : वाड्याला लागलेल्या आगीकडे लोक भेदरलेल्या नजरेने पाहत होते.

८) हायसे वाटणे - वाक्य : परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले पाहून रंगीला हायसे वाटले.

९) डोळे पाणावणे - वाक्य : खूप दिवसांनी घरी परतलेल्या राजूला पाहून आईचे डोळे पाणावले.

१०) प्रसंगाचे गांभीर्य जाणणे - वाक्य : प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली.

११) मार्गी लावणे - वाक्यात : शिवरामपंत यांनी पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना मार्गी लावले.

१२) निपचीत पडणे - वाक्य : आजारी असलेले वासरू निपचीत पडून होते.

१३) ठावठिकाणा नसणे - वाक्य : काल दिवसभर पाऊस कोसळला, पण आज त्याचा कुठेही ठावठिकाणा नव्हता.

१४) माग काढणे - वाक्य : चोराचा माग काढत पोलीस जंगलात पोहोचले.

१५) सावध करणे - वाक्य : कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले.

१६) फवारा सोडणे - वाक्य : लादी धुण्यासाठी आईने लादीवर पाण्याचा फवारा सोडला.

१७) तत्पर असणे - वाक्य : दुसर्याला मदत करायला नेहमी तत्पर असावे.

१८) पळ काढणे - वाक्य : पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला.

१९) प्रफुल्लित होणे - वाक्य : सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रफुल्लित होते.

२०) सार्थकी लागणे - वाक्य : राजू शिकून मोठा झाला, त्याच्या आईचे कष्ट सार्थकी लागले.

२१) गणती करणे - वाक्य : मितालीने वर्गातल्या विद्यार्थ्यांची गणती केली.

मराठी वाक्प्रचार Flipbook

येथे क्लिक करा

     निर्मिती : सौ. कल्पना चव्हाण, नाशिक     

أحدث أقدم